सांगली : जिल्ह्यातील कोरोना (Corona) रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी निर्बंध पुन्हा एकदा कडक करण्याचे आदेश दिले आहेत. नव्या निर्बंधांनुसार अत्यावश्यक सेवेतील दुकानांना घरपोच सेवा देण्याचे नियोजन करण्याच्या सूचना पालिका प्रशासनाला करण्यात आली आहे. तसेच रस्त्याच्या बाजूला खाद्यपदार्थ विक्री आणि आठवडा बाजारावर बंदी घालण्यात आली आहे. येत्या 19 जुलैपर्यंत जिल्ह्यात चौथ्या स्तराचे नियम लागू असतील. या सर्व निर्बंधांची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना पालिका आणि पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहेत. (Corona patient increased in Sangli Collector order to tighten restrictions)
सांगली जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या आता पुन्हा वाढू लागलेली आहे. रोजचा आकडा हा हजारांच्या घरात पोहोचत आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून निर्बंध कडक करण्यात आले आहेत. सध्या पॉझिटिव्हिटी दर हा दहा टक्क्याच्या पुढे आणि वीस टक्क्यांच्या आत असल्याने सांगली जिल्ह्याचा चौथ्या स्तरात समावेश आहे. 19 जुलैपर्यंत चौथ्या स्तराचे निर्बंध जिल्ह्यात लागू आहेत.
मात्र रुग्णसंख्या वाढत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी लागू असलेले निर्बंध आणखी कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातल्या रस्त्याच्या कडेला असणारे खाद्यपदार्थ विक्री करण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. त्याचबरोबर शहरातील रस्त्यांवर विनापरवाना विक्री व्यवसायालाही बंदी घालण्यात आली आहे.
त्याचबरोबर अत्यावश्यक सेवेतील वस्तू घरपोच देण्याबाबत पालिका प्रशासनाने योग्य नियोजन करण्याच्या सूचना देखील जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली आहे. सध्या सकाळी 7 ते 4 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी आहे. तसेच भाजी मंडईमध्ये भाजीपाला विक्री करण्यासदेखील परवानगी आहे.
इतर बातम्या :
महाविकास आघाडीतील कुरबुरी पवारांच्या दरबारात?; काँग्रेस नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट
बेरोजगारीवर सरकारचा अॅक्शन प्लॅन; उद्योगांना नव्या रोजगारांवर सवलत मिळणार; सर्व काही जाणून घ्या#indiaunemployment #IndiaUnemploymentrate #inflationandunemploymenthttps://t.co/r4XlyngeMj
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 13, 2021
(Corona patient increased in Sangli Collector order to tighten restrictions)