बीड: सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची यांनी परळी येथील जोतिर्लिंग मंदिराला (Parali Temple Threat Letter) उडवून देण्याची धमकी देणाऱ्यांविरोधात तातडीनं कारवाई करण्यात येत असल्याचं म्हटलं आहे. बीड जिल्ह्यातील भाविकांनी घाबरुन जाऊ नये, असं आवाहन केलं आहे. कोणीही घाबरून जाण्याचे कारण नाही, प्रभू वैद्यनाथ मंदिराची एक विट सुद्धा इकडची तिकडे होणार नाही, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. याशिवाय गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, डीजीपी आणि बीड पोलीस अधीक्षक आणि दहशतवाद विरोधी पथकास माहिती दिल्याचं धनंजय मुंडे यांनी ट्विट द्वारे कळवलं आहे.
धनंजय मुंडे यांनी केलेल्या ट्विटमध्ये “श्री क्षेत्र परळी वैद्यनाथ या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एका ज्योतिर्लिंग मंदिरास आरडीएक्सने उडवण्याची धमकी मंदिर ट्रस्टला मिळाली आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, डीजीपी, बीड एसपी, तसेच दहशतवाद विरोधी पथकास याबाबत माहिती दिली असून, पोलीस खाते याबाबत त्वरित अॅक्शन घेत आहे.
कोणीही घाबरून जाण्याचे कारण नाही, प्रभू वैद्यनाथ मंदिराची एक विट सुद्धा इकडची तिकडे होणार नाही. वैद्यनाथ प्रभू दुःख, अडचणी, आजार बरे करणारे वैद्य हे नाव घेऊन परळीत अनादी कालापासून विराजमान आहेत. 50 लाख रुपयांची मागणी करून धमकी देणारे गजाआड होतील, असं मुंडे म्हणालेत.
श्री क्षेत्र परळी वैद्यनाथ या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एका ज्योतिर्लिंग मंदिरास आरडीएक्सने उडवण्याची धमकी मंदिर ट्रस्टला मिळाली आहे. गृहमंत्री @Dwalsepatil साहेब, @DGPMaharashtra , @BEEDPOLICE ,तसेच दहशतवादी विरोधी पथकास याबाबत माहिती दिली असून,पोलीस खाते याबाबत त्वरित ऍक्शन घेत आहे
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) November 26, 2021
बीड जिल्ह्यातील परळी येथील वैद्यनाथ मंदिर आरडीएक्सने उडवून देण्याची धमकी मंदिर ट्रस्टला मिळाली आहे. धमकी देणारं पत्र नांदेडहून आल्याची प्राथमिक माहिती आहे. पत्राचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी मंदिराच्या सुरक्षेत वाढ केली आहे.
50 लाखांची मागणी
मंदिर उडवून देण्याची धमकी नेमकी कोणी दिली याविषयी सविस्तर माहिती समोर आलेली नाही. मात्र, 50 लाख रुपये द्या अन्यथा मंदिर उडवू असं, या पत्रात सांगण्यात आलं आहे. मंदिर उडवून देण्याची धमकी मिळाली असल्यानं मंदिर प्रशासन चांगलेच धास्तावले आहे.
पोलिसांकडून अधिक तपास सुरु
परळी शहर पोलीस स्टेशनला धमकीचं पत्र मिळाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परळी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
इतर बातम्या:
Dhananjay Munde said people of Parali no need to panic after threat letter received by Parali Police will take necessary action on it