सोलापूर: लखीमपूर येथे झालेल्या हिंसेत ठार झालेले शेतकरी आणि एका पत्रकाराच्या अस्थींचं आज पंढरपुरातील चंद्रभागा नदीत विसर्जन करण्यात आलं आहे. शेतकरी आणि वारकऱ्यांना दिंडी काढत या अस्थिंचं विसर्जन केलं. यावेळी पंचक्रोशीतील शेकडो शेतकरी आणि वारकरी उपस्थित होते.
शेतकरी आणि वारकऱ्यांनी दिंडी काढून विठू नामाच्या जयघोषात अस्थिंचं चंद्रभागेच्या पात्रात विसर्जन केलं. त्यापूर्वी या अस्थी नामदेव पायरीवर दर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या. त्यानंतर नामदेव पायरीपासून ते चंद्रभागा घाटापर्यंत दिंडी काढण्यात आली. नंतर विधीवत या अस्थिंचं विसर्जन करण्यात आलं.
विठ्ठल हा शेतकऱ्याचं दैवत आहे. पंढरपुरात येणारा भाविक हा शेतकरीच आहे. शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरोधात लढण्यासाठी शेतकऱ्यांना शक्ती मिळावी असे साकडे यावेळी शेतकऱ्यांनी विठू चरणी घातले, असं शेतकरी नेते विनायक पाटील यांनी सांगितलं. शेतकरी नेते विनायक पाटील यांच्या पुढाकारानेच या अस्थी पंढरपुरात आणण्यात आल्या होत्या.
उत्तर प्रदेशाच्या लखीमपूर खीरीमध्ये राज्यातील मंत्र्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु होतं, ज्या आंदोलनात 2 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. रविवारी राज्यातील विकासकामाच्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि केंद्रिय मंत्री अजय मिश्र आले होते. त्यांना विकासकामाचं उद्घाटन केल्यानंतर एका कार्यक्रमासाठी बनवीरपूर गावात जायचं होतं. दरम्यान, इथं मंत्री येणार असल्याने कृषी कायद्याला विरोध करणारे शेतकरी इथं एकत्र झाले, आणि काळे झेंडे घेऊन ते तुकुनिया परिसरात पोहचले. दरम्यान, यावेळी मंत्र्याच्या जाणाऱ्या गाड्यांच्या स्वॉर्डने विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडलं. केंद्रीय मंत्री अजय मिश्र यांचा मुलगा अभय मिश्रने हे कृत्य केल्याचा गंभीर आरोप, घटनास्थळी असेलल्या शेतकऱ्यांनी केला आहे. या दुर्घटनेत 2 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला, संतापलेल्या शेतकऱ्यांनी 3 गाड्या जाळून टाकल्या, यूपीत हिंसाचार उफाळला, ज्यात आतापर्यंत 8 लोक मृत्यूमुखी पडल्याची माहिती आहे.
VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 20 October 2021https://t.co/HRVDKF8hda#MahafastNews100 #mahafast100newsbulletin #MaharashtraNews
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 20, 2021
संबंधित बातम्या:
अजितदादांना म्हटलं परवानगी द्या, त्या सोमय्याला बघून घेतो, साताऱ्यातल्या सभेत शशिकांत शिंदे आक्रमक
देगलूरमध्ये भाजपला आघाडी द्या अन् गाव जेवण घ्या; चंद्रकांतदादांची कार्यकर्त्यांना खुली ऑफर
तरुणाला धबधब्यात बुडताना पाहून मित्रांचा पोबारा, घरी वेगळाच बनाव, अखेर तीन दिवसांनी बिंग फुटलं
(Farmers Pay Tribute to Those Killed in Lakhimpur Kheri in pandharpur)