सिंधुदुर्ग : गतवर्षीच्या गणेशोत्सवात कोकणात जायला न मिळालेल्या चाकरमन्यांनी यंदा आठवडाभराअगोदरच गावी जाण्याची तयारी सुरु केली आहे. पण कोरोनाचं संकट लक्षात घेता सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर आरोग्य पथकं तैनात करण्यात आली आहेत. चाकरमन्यांची पहिल्यांदा कोरोना चाचणी केली जाईल मगच त्यांना जिल्ह्यात प्रवेश दिला जाईल.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्व सीमेवर आजपासून आरोग्य पथके तैनात करण्यात आली आहेत. या आरोग्य पथकांद्वारे जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांची तपासणी आणि चाचणी करण्यात येणार आहे. दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना थेट प्रवेश दिला जाणार आहे. तसेच आरटीपीसीआर चाचणी करून 72 तास व्हायच्या आधी आलेल्या प्रवाशांना तपासणी शिवाय जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार आहे.
अन्य सर्व प्रवाशांची सीमेवर रॅपिड टेस्ट करूनच मग प्रवेश दिला जाणार आहे. कणकवली तालुक्यात 10 आरोग्य पथकांची निर्मिती करण्यात आली असून खारेपाटण चेकपोस्टवर सहा, फोंडाघाट चेकपोस्टवर दोन व कणकवली रेल्वे स्थानकात दोन पथके सज्ज झाली आहेत.
तसेच सावंतवाडी तालुक्यातील आंबोली व वैभववाडी तालुक्यातील करूळ या सीमेवरील चेकपोस्टवर ही आरोग्य पथके तैनात करण्यात आली आहेत.आजपासून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची नोंद ठेवून चाचणी व तपासणी या आरोग्य पथकांकडून करण्यात येणार आहे.
रत्नागिरी जिल्हा प्रशासनानं गणेशोत्सवासाठी आता नियमावली जाहीर केलीय. त्यामध्ये आता गणेशोत्सवासाठी जिल्ह्यामध्ये प्रवेश करणाऱ्या व्यक्तीने लसीचे दोन डोस पूर्ण झालेले नसल्यास आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक असणार आहे. हे रिपोर्ट 72 तासांपूर्वीचे असणे बंधनकारक असणार आहे. पण ज्या व्यक्तीचे दोन डोस पूर्ण झालेले आहेत, अशा व्यक्तीला मात्र हा रिपोर्ट लागू नाही. त्यामुळे डोस पूर्ण झालेली व्यक्ती कोणत्याही रिपोर्टशिवाय जिल्ह्यात प्रवेश करू शकते.
तसेज ज्या व्यक्तीकडे आरटीपीसीआर रिपोर्ट नसणार आहे, अशा व्यक्तीची जिल्ह्यात प्रवेशापूर्वी कोरोना चाचणी केली जाणार आहे. त्यानंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास त्याला संस्थात्मक विलगीकरणात ठेवले जाणार आहे. याशिवाय कोरोना वाढीला निमंत्रण मिळणार नाही, अशी काळजी घेण्याचं आवाहन देखील यावेळी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेय.
? दोन डोस झालेले नसल्यास RTPCR रिपोर्ट बंधनकारक
? 72 तासांपूर्वी करावी लागणार आरटीपीसीआर टेस्ट
? दोन डोस पूर्ण झालेल्या व्यक्तीला मिळणार जिल्ह्यात प्रवेश!
? जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर मास्क घालणे सक्तीचे
? जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर सामाजिक अंतर राखणे आवश्यक
? एकाच ठिकाणी मोठ्या संख्येनं गर्दी करण्यास मनाई
(Going to village For ganeshotsav entry to Sidhudurg ratnagiri District only After taking 2 Dose New Rules Annoucement)
हे ही वाचा :
कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफी, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर निर्णय; सुविधा कशी मिळणार?