बांधकाम सुरु असताना क्राँकीट लिफ्ट कोसळली, तीन वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

| Updated on: Jul 05, 2021 | 1:06 PM

घराचे बांधकाम सुरु असताना क्राँकीटवर नेण्यासाठी तात्पुरती तयार केलेली लिफ्ट अंगावर कोसळल्याने चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे.

बांधकाम सुरु असताना क्राँकीट लिफ्ट कोसळली, तीन वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी अंत
gondia lift collapsed
Follow us on

गोंदिया : घराचे बांधकाम सुरु असताना क्राँकीटवर नेण्यासाठी तात्पुरती तयार केलेली लिफ्ट अंगावर कोसळल्याने चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. जिगर पंकज तिडके असे या तीन वर्षीय मुलाचे नाव आहे. गोंदियातील जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यात मुंडीकोटो जमानगर येथे ही घटना घडली आहे. (Gondia Construction Temporarily built elevator collapse three years child dead)

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यात मुंडीकोटा जमानगर या ठिकाणी मोरेश्वर तिडके राहतात. मोरेश्वर तिडके यांच्या घराच्या स्लॅबचे काम सुरु होते. या घराचे स्लॅबचे काम करण्यासाठी लाखेगाव याठिकाणी मन्सूर खोब्रागडे यांच्या मालकीचे लिफ्ट बोलवण्यात आले होते.

हे बांधकाम सुरु असलेल्या घराशेजारी झोपडीत 4 लहान मुलं राहत होती. दरम्यान घराच्या छताचे काम सुरु असतेवेळी क्राँकीट वर नेण्यासाठी लिफ्ट बनवण्यात आली होती. मात्र ही लिफ्ट नीटनेटकी बांधली नसल्याने ती लिफ्ट क्राँकीटसह झोपडीवर कोसळली.

गावात शोककळा

यावेळी घरात असलेले तीन बालके थोडक्यात बचावले. तर घराच्या बाहेर असलेल्या चिमुकला त्यात दबला गेला. मात्र गंभीर दुखापत झाल्याने त्याला तात्काळ तुमसर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचे निधन झाले. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.

(Gondia Construction Temporarily built elevator collapse three years child dead)

संबंधित बातम्या :

अंबरनाथच्या ओढ्यात हजारो मृत माशांचा खच, पोल्ट्री फार्मच्या कचऱ्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप

खनिकर्म महामंडळातील कोल वॉशरीज घोटाळ्याची ईडी किंवा सीबीआयमार्फत चौकशी करा; राष्ट्रवादीच्या नेत्याची मागणी

सततचं लॉकडाऊन, बिकट आर्थिक परिस्थिती, जळगावात कर्जबाजारी सलून कामगाराची आत्महत्या