अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत; विशेष मदत पॅकेजची घोषणा करा, राजू शेट्टी यांची मागणी

| Updated on: Dec 06, 2021 | 7:03 AM

अवकाळी पावसामुळे द्राक्ष पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत आले असून, त्यांना मदत मिळायला हवी. नुकसानग्रस्त द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना विशेष मदत पॅकेजची घोषणा करावी, तसेच हवामान आधारित द्राक्ष पीक विमा योजना सक्षम करावी अशी मागणी माजी खा. राजू शेट्टी यांनी केली आहे.

अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत; विशेष मदत पॅकेजची घोषणा करा, राजू शेट्टी यांची मागणी
राजू शेट्टी
Follow us on

सांगली : गेल्या काही वर्षांपासून निसर्गाचा लहरीपणा पहायला मिळत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. कधी ओला दुष्काळ तर कधी सुका दुष्काळ यामुळे शेतकरी भरडून निघत आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. यंदाही अवकाळी पावसामुळे द्राक्ष पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत आले असून, त्यांना मदत मिळायला हवी. नुकसानग्रस्त द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना विशेष मदत पॅकेजची घोषणा करावी, तसेच हवामान आधारित द्राक्ष पीक विमा योजना सक्षम करावी अशी मागणी माजी खा. राजू शेट्टी यांनी केली आहे. ते मिरज तालुक्यातील लिंग्णूर, बेडग, खटाव येथील नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांची देखील उपस्थिती होती.

जिल्ह्यात साडेचार हजार कोटींचे नुकसान

राज्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अवकाळी पाऊस सुरू आहे. अवकाळी पावसामुळे सांगली जिल्ह्यातील मिरज, तासगाव, पलूस, जत, कवठेमहांकाळ, खानापूर आदी तालुक्यातील 60 ते70 हजार एकरावरील द्राक्ष बागेचे नुकसान झाले आहे. पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे पिकावर घडकुज. दावन्या अशा विविध प्रकारचे रोग पडल्याने द्राक्ष बगाचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. द्राक्ष बागासाठी एकरी चार ते पाच लाखांचा खर्च येतो. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील नुकसानीचा सरासरी आकडा हा चार ते साडेचार हजार कोटींवर गेल्याचा अंदाज आहे. राजू शेट्टी यांनी नुकसानग्रस्त बागांची पाहाणी करत शेतकऱ्यांना धीर दिला.

इतर पिकांनाही फटका

दरम्यान अवकाळी पावसामुळे केवळ द्राक्ष बागांचेच नाही तर इतर पिकांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे गव्हाचे पिक पूर्णपणे आडवे झाले आहे, गव्हासोबतच हारभारा, ऊस, धान या पिकांना देखील मोठा फटका बसला आहे. वातावरणात झालेले बदल आणि ढगाळ वातावरण यामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. हरभाऱ्यावर आळी पडली आहे. तर वेचणीसाठी आलेला कापूस पावसात भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

संबंधित बातम्या 

Omicron : राज्यात आणखी 7 जणांना ओमिक्रॉन, पिंपरी-चिंचवडमध्ये 6, पुण्यात 1 ओमिक्रॉनबाधित

Omicron cases: धोका वाढला! पिंपरी-चिंचवडमध्ये दोन लहान मुलींना ओमिक्रॉनची लागण, आरोग्य विभागाचे धाबे दणाणले

Omicron : ओमिक्रॉनचे 8 रुग्ण आढळल्याने राज्याचे धाबे दणाणले, दक्षिण आफ्रिकेतील तज्ज्ञांशी बैठक