परभणी : कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने आधी पत्नीची हत्या करुन मग स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना परभणी जिल्ह्यातील पालमच्या पुयणी गावात घडली आहे. कर्जबाजारीपणाला कंटाळलेल्या पतीने पत्नीचा गळा दाबून खून केल्यानंतर स्वतः गळफास घेत आत्महत्या केली. रंगनाथ शिंदे असे आत्महत्या करणाऱ्या पतीचे तर सविता रंगनाथ शिंदे असे हत्या करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी पालम पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रंगनाथ शिंदे हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. अवकाळी पाऊस आणि सतत येणारा वादळी वारा यामुळे शेतकऱ्याच्या हातचे पीक गेले आहे. शेतातील पिक हातातून गेल्यामुळे बँकेचे कर्ज कसे या विवंचनेत शिंदे होते. याच विवंचनेतून टोकाचे पाऊल उचलत रंगनाथ यांनी रात्री गाढ झोपेत असलेल्या पत्नीचाी गळा दाबून हत्या केली आणि त्यानंतर स्वतः आत्महत्या केली. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.
रंगनाथ यांचा मुलगा सकाळी 6 वाजता शेतातून घरी आला. त्यावेळी आई वडिलांच्या खोलीचे दार बंद असल्याचे त्याने पाहिले. सहा वाजले तरी आई वडिल उठले नाहीत म्हणून मुलाने दार ठोठावले. मात्र बराच वेळ दार ठोठावूनही शिंदे यांनी कोणताच प्रतिसाद दिला नाही. अखेर मुलाने ग्रामस्थांच्या मदतीने दरवाजा तोडून आत जाऊन पाहिले असता आई वडिल दोघे मृतावस्थेत आढळले.
पुयणी गावच्या पोलीस पाटलांनी तात्काळ पालम पोलिस ठाण्यात घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत. (In Parbhani, wife’s murder and husband’s suicide due to debt and infertility)
इतर बातम्या
Wardha: धक्कादायक! अल्पवयीन मुलीचा बेकायदेशीर गर्भपात; डॉक्टरसह दोघांना अटक
Mumbai Crime : अभिनेत्रीचे न्यूड फोटो काढून ब्लॅकमेल करणाऱ्या कास्टिंग डायरेक्टरला अटक