गडचिरोली : कोरोनाची तिसऱ्या लाटेचा हळूहळू फैलाव होण्यास सुरुवात झाली आहे. काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात प्रशासनाने जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत. कोरोनाचा पुन्हा वाढता आकडा लक्षात घेत जिल्हा प्रशासनाकडून सभा, मिरवणूक, लग्न समारंभ आणि यात्रा उत्सव यांच्यावर निर्बंध लादण्यात आले आहेत. तसेच संपूर्ण जिल्ह्यात 28 सप्टेंबर रोजी रात्री 12 वाजल्यापासून 12 ऑक्टोबर रोजी रात्री 12 वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. (In view of the growing influence of Corona, a curfew was ordered in Gadchiroli)
जिल्ह्यात 4 ऑक्टोबरपर्यंत मस्कऱ्या गणेशोत्सव सुरू असणार आहे. त्यानंतर 7 ऑक्टोबर पासून घटस्थापना सुरू होत आहे. या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्ह्यात प्रशासनाने जमावबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. जमावबंदी काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावा यासाठी जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) आणि (3) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन हा ठोस निर्ण घेतला आहे. त्यानुसार दिनांक 28 सप्टेंबर ते 12 ऑक्टोबर या कालावधीत काही गोष्टींना मनाई केलेली आहे.
जमावबंदी काळात शस्त्र, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या यासारख्या शारीरिक इजा पोहचवणाऱ्या वस्तू सोबत बाळगण्यास मनाई असेल. तसेच, कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्र सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, किंवा जमा करणे किंवा तयार करणे यावर प्रतिबंध घालण्यात आले आहेत.
कोणत्याही व्यक्तीच्या प्रतिमांचे प्रदर्शन करणे, जाहीरपणे घोषणाबाजी, गाणी गाणे, वाद्य वाजवणे अशाप्रकारे कोणतीही कृती ज्यामुळे सामाजिक नितीमत्तेला धक्का पोहोचेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल अशा गोष्टींना सक्त मनाई आहे.
उपविभागीय दंडाधिकारी, कार्यकारी दंडाधिकारी अथवा संबंधित पोलीस स्टेशन अधिकारी यांच्या पूर्व परवानगी शिवाय कोणतीही मिरवणूक काढू नये, पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी जमण्यास मनाई आहे. निर्बंध काळात कोणतेही कार्यक्रम आयोजित करता येणार नाहीत, असे प्रशासनाने आपल्या आदेशात म्हटले आहे. (In view of the growing influence of Corona, a curfew was ordered in Gadchiroli)
Hingoli Rain | हिंगोलीत पुराच्या पाण्यात बस चालवण्याचं धाडस -tv9#Rain #Hingoli #Weather #WeatherForecast #MaharashtraWeather pic.twitter.com/AQuT77074W
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 28, 2021
इतर बातम्या
VIDEO | उस्मानाबाद जिल्ह्यात पावसाचा कहर सुरुच, पूराच्या पाण्यातून 459 जणांना वाचवले