कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर पंचायत समितीकडे दिव्यांग लोकांसाठी आलेले जयपूर फूट पुराच्या पाण्यात अक्षरशः कुजून गेलेत. त्यामुळे पंचायत समिती प्रशासनाच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त होतोय. केंद्र सरकारच्या दिव्यांग योजनेअंतर्गत जयपूर साहित्य 2 वर्षांपूर्वी पंचायत समितीला प्राप्त झाले होते. साहित्य पात्र लाभार्थ्यांना देण्यासाठी पंचायत समिती सदस्यांनी देखील मासिक सभांमध्ये याबाबत पाठपुरावा केला होता. मात्र नुकत्याच आलेल्या महापुरात पंचायत समितीची इमारत पाण्याखाली गेली. यात जयपूर फूट खराब झालेत.
VIDEO : दिव्यांगांचं साहित्य पुराच्या पाण्यात सडलं, पण वाटप नाही, कोल्हापुरातील करवीर पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा@mrhasanmushrif #Kolhapur #Karvir pic.twitter.com/JTTGoBzFW8
— Pravin Sindhu | प्रविण सिंधू ??✊ (@PravinSindhu) August 19, 2021
अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेच दिव्यांगांसाठीच्या या साहित्याचं नुकसान झाल्याचा आरोप होतोय. तसेच याची भरपाई अधिकारी-कर्मचार्यांच्या पगारातून करावी, अशी मागणी पंचायत समिती पदाधिकाऱ्यांनी केलीय.
दिव्यांग बांधवांसाठी आलेल्या इतर साहित्याचं वाटप पंचायत समितीने केलं. मात्र, काही तांत्रिक कारणामुळे जयपूर फूटचं वाटप करता आलं नाही. खराब झालेले जयपूर फूट बदलून घेण्याबाबत संबंधित कंपनीशी पत्रव्यवहार सुरू असल्याचं स्पष्टीकरण अधिकाऱ्यांकडून देण्यात आलंय.