जळगाव : जिल्ह्यातील कोरोना संसर्ग सध्या नियंत्रणात असल्याने जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंधांमध्ये सूट दिली आहे. जिल्ह्यात नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या नव्या निर्बंधानुसार अत्यावश्यक तसेच इतर सर्व प्रकारच्या सेवा या रात्री 9 वाजेपर्यंत सुरु ठेवता येतील. तसेच ही दुकाने सुरु ठेवण्यासाठी काही नियम घालून देण्यात आले आहेत. तसेच नव्या नियमांनुसार आता जिल्ह्यात शॉपिंग मॉल, थिएटर्स, नाट्यगृह, सिंगल स्क्रिन मल्टिप्लेक्स सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, त्यासाठी क्षमतेच्या 50 टक्के प्रेक्षकांनाच बसण्याची परवानगी असेल. (Jalgaon Corona situation under control latest update of all new unlock rules)
जिल्ह्यात नवे नियम काय आहेत ?
-अत्यावश्यक व इतर सर्व प्रकारच्या सेवा रात्री 9 वाजेपर्यंत सुरु ठेवता येतील. मात्र, सर्व दुकानदारांनी आपल्या दुकानात 5 पेक्षा अधिक ग्राहकांना प्रवेश देऊ नये. तसेच दुकानाच्या दर्शनी भागात काच किंवा पारदर्शक शीट लावावी. सॅनिटायझेशनचीसुद्धा व्यवस्था करावी असे निर्बंध आहेत.
-शॉपिंग मॉल, थिएटर्स, नाट्यगृह, सिंगल स्क्रिन मल्टिप्लेक्स सुरु करण्यास मुभा. मात्र,क्षमतेच्या 50 टक्के ग्राहक बसू शकतील.
-हॉटेल, रेस्टॉरंट व बार 50 टक्के ग्राहक क्षमतेसह सुरु करण्यास मुभा देण्यात आली आहे. सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत म्हणजेच एकूण बारा तास या आस्थापना सुरु ठेवता येतील.
-सार्वजनिक ठिकाणे, मॉर्निंग वॉक, सायकलिंग, सर्व प्रकारच्या बैठका, ग्रामपंचायत निवडणूक, को-ऑपरेटिव्ह निवडणुका, बांधकामे, कृषी संबंधित कामे, सार्वजनिक वाहतूक, माल वाहतूक, सर्व कंपन्या, औद्योगिक आस्थापना या दिवसभर सुरु ठेवता येतील.
-आंतरजिल्हा प्रवासासाठी ई पासची गरज असणार नाही. मात्र, लेव्हल 5 मध्ये समावेश असणाऱ्या जिल्ह्यात प्रवासासाठी ई पास आवश्यक असणार आहे.
-खासगी कार्यालये व सरकारी कार्यालये 100 टक्के उपस्थितीसह सुरू असतील
-क्रीडा प्रकार, तत्सम स्पर्धांचे आयोजन करण्यास मुभा असेल. मात्र, त्यासाठी 50 टक्के प्रेक्षकांची मर्यादा असेल.
-जिम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा तसेच वेलनेस सेंटर्स 50 टक्के ग्राहक क्षमतेसह सुरु करता येतील.
जळगाव जिल्ह्यातील परिस्थिती सध्या नियंत्रणात असल्याने जिल्हा प्रशासनाने कडक निबंधांमध्ये सूट दिली आहे. परंतु, भविष्यात जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी दर हा 5 टक्क्यांपेक्षा अधिक झाला किंवा ऑक्सिजन बेडची उपलब्धता 25 टक्केपेक्षा जास्त झाल्यास नव्याने सुधारित आदेश जारी केले जातील, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.
इतर बातम्या :
मुंबईकरांनो तुम्ही जे कराल ते इथेच भराल, ‘ती’ गाडी बघता बघता का बुडाली? वाचा, पहा
(Jalgaon Corona situation under control latest update of all new unlock rules)