जळगाव : जूनच्या पहिल्या आठवड्यापासून महाराष्ट्रात चांगलाच पाऊस बरसत आहे. फक्त मुंबई पुण्यातच नाही, तर भुसावळ, मध्यप्रदेश आणि विदर्भातील काही भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे हतनूर धरणाचे 4 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहे. सध्या या धरणातून 6534 क्यूसेस वेगाने पाण्याचा सोडण्यात येत आहे. यामुळे तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (Jalgaon Hatnur Dam four Gates Open)
हतनूर धरणाच्या जलसाठ्यात मोठी वाढ
गेल्या काही दिवसांपासून विदर्भ आणि मध्यप्रदेशात मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे तापी आणि पूर्णा या दोन्ही नद्या दुथडी भरुन वाहत आहे. यामुळे हतनूर धरणाच्या जलसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. हतनूर धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाल्याने त्याचे चार दरवाजे उघडण्यात आले आहे.
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
यंदाच्या मोसमात पहिल्यांदा या धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असून सध्या 6534 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे बॅक वॉटरचा फटका लगतच्या गावांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या हे धरण टप्प्याटप्प्याने भरले जाते आहे. मात्र तरी हतनूर धरणाजवळ असलेल्या गावांमधील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच तापी नदीपात्रामध्ये कुणीही आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी पात्रामध्ये जाऊ नये, असे आवाहन हतनूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता महाजन यांनी केले आहे. (Jalgaon Hatnur Dam four Gates Open)