जळगाव: जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील (Pachora) कामगारांच्या वाहनाला चाळीसगाव (Accident near Chalisgaon) नजीक अपघात झाल्याची घटना घडलीय. या अपघातात 4 कामगारांचा मृत्यू (Three Workers Died) झाला आहे. तर, 13 जण जखमी झाले असल्याची माहिती आहे. या अपघातातील जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, 2 गंभीर जखमींना धुळ्याला हलवलण्यात आलं आहे.
बुधवारी रात्री 10 वाजता रेल्वे कामगारांच्या वाहनाचा अपघात होऊन त्यात 4 जण जागीच ठार झाले. तर, अन्य 13 जण जखमी झाली आहेत. त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्यानं धुळे येथील शासकीय रुग्णलयात हलवण्यात आल्याची माहिती आहे. हे सर्व कामगार क्रुझर या वाहनातून प्रवास करत होते.
कोरोना मुळे रेल्वे प्रवास अपडाऊनसाठी बंद असल्याने डोंगरगाव ता.पाचोरा येथील ही कामगार दैनंदिन खासगी वाहनातून मनमाड मालधक्क्यावर मजुरी साठी येजा करत होते. मजूर ज्या गाडीतन प्रवास करत होते ती क्रुझर गाडी क्रमांक एम एच 13 एसी 5604 पाचोरा तालुक्यातील हिरापूर गावाजवळ पलटी झाली. या अपघात होऊन नाना उर्फ भाउलाल भास्कर कोळी (40) विकास जलाल तडवी (29) दोघे रा. डोंगरगाव तर एक मयत मुक्तार तडवी सार्वे हे जागीच ठार झाले.
युनुस अल्लारखाँ तडवी, चंदन हरीश खाटीक, समाधान नारायण पाटील यांच्यासह इतर गंभीर जखमी आहेत. जखमींवर चाळीसगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातामध्ये जखमी झालेल्यांपैकी दोघे गंभीर जखमी असल्यानं त्यांना उपचारासाठी धुळे येथील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.
इतर बातम्या:
Maharashtra Rains and Weather News LIVE: महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहणार? मुंबईत पाऊस सुरुच