तर बांगड्या घालूनच फिरलेलं बरं…, उदयनराजे यांची ‘ती’ ऑडिओ क्लिप व्हायरल; निशाणा कुणावर?

| Updated on: Dec 04, 2022 | 11:28 AM

राज्यपाल कोश्यारी यांच्या विधानाच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड येथील सामाजिक संस्थांनी पिंपरी चिंचवड बंदची हाक देण्यात आली आहे. येत्या 8 डिसेंबर रोजी पिंपरी चिंचवडमध्ये बंद पुकारण्यात येणार आहे.

तर बांगड्या घालूनच फिरलेलं बरं..., उदयनराजे यांची ती ऑडिओ क्लिप व्हायरल; निशाणा कुणावर?
तर बांगड्या घालूनच फिरलेलं बरं..., उदयनराजे यांची 'ती' ऑडिओ क्लिप व्हायरल; निशाणा कुणावर?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

जालना: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारं विधान केलं. त्यामुळे राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. खासदार उदयनराजे भोसले यांनीही राज्यपालांच्या विरोधात आंदोलनाची हाक दिली आहे. उदयनराजे यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी उदयनराजे यांना फोन केला होता. त्यावेळी उदनराजे यांनी संताप व्यक्त केला. अशा थर्ड क्लास लोकांना शिवाजी महाराजांचा अवमान करण्याचा अधिकार कुणी दिला? असा सवाल करतानाच राज्यपालांना हटवलं गेलं नाही तर बांगड्या घालूनच फिरलेलं बरं… असा संताप उदयनराजे यांनी व्यक्त केला आहे. उदयनराजे आणि गोरंट्याल यांच्या संभाषणाची ही ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे.

एवघ्या एक मिनिटाची ही ऑडिओ क्लिप आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये कैलास गोरंट्याल उदयनराजे यांना पाठिंबा देताना दिसतात. आम्ही तुमच्यासोबत आहोत. राजेसाहेब तुम्ही फक्त आदेश द्या, असं गोरंट्याल म्हणाताना ऐकायला येतंय. तर उदयनराजे राज्यपालांसह बेताल वक्तव्य करणाऱ्या राजकारण्यांविरोधात संताप व्यक्त करताना दिसत आहेत.

हे सुद्धा वाचा

ऑडिओ क्लिप संभाषण जसंच्या तसं

कैलास गोरंट्याल: नमस्कार, आमदार गोरंटयाल बोलतो. आमचा पाठिंबा आहे तुम्हाला.

उदयनराजे: एवढे मोठे व्यक्तीमत्व जन्माला येणार आहे का? सन्मान करू नका, पण…

कैलास गोरंट्याल: अवमान करु नका

उदयनराजे: थर्ड क्लास लोकांना त्यांचा अवमान करण्याचा अधिकार कोणी दिल? त्यांचा अवमान म्हणजे तुम्ही त्यांच्या बद्दल बोलत आहात.

कैलास गोरंट्याल: सर, आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुम्ही फक्त आदेश द्या.

उदयनराजे: आदेश काही नाही. पण तुम्हाला अंतःकरणात वाटते ना…

कैलास गोरंट्याल: हो सर, राज्यपाल जात नाही तो पर्यंत आंदोलन करायचे.

उदयनराजे: करायचे म्हणजे? हाकलले पाहिजे. नाही तर बांगड्या घालून फिरलेले बरे ना…

कैलास गोरंट्याल: त्याला हाकलले पाहिजे आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत

उदयनराजे: थँक्यू… थँक्यू…

पिंपरी चिंचवडमध्ये बंद

दरम्यान, राज्यपाल कोश्यारी यांच्या विधानाच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड येथील सामाजिक संस्थांनी पिंपरी चिंचवड बंदची हाक देण्यात आली आहे. येत्या 8 डिसेंबर रोजी पिंपरी चिंचवडमध्ये बंद पुकारण्यात येणार आहे. या बंदमध्ये भाजप सहभागी होणार नसल्याचं सांगितलं जात आहे.

दुसरीकडे उदयनराजे भोसले यांनीही विराट मोर्चाची हाक दिली आहे. आझाद मैदानावर हा विराट मोर्चा होणार आहे. त्याची तयारी सुरू करण्यात आली असून या मोर्चात हजारो शिवप्रेमी एकवटणार असल्याचं सांगितलं जात आहे.