कोल्हापूर : प्रशासन आणि समान्य माणूस यांचे संबंध आता पूर्वीसारखे राहिले नाहीत. प्रशासनातील अधिकारी पैशाच्या आणि अधिकाराच्या जोरावर जनसामान्यांना त्रास देण्याचे काम करत आहेत अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. यावेळी त्यांनी प्रशासनातील अधिकारी आणि बदल्यांच्या संदर्भात त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले की, सध्या राज्यात बदल्यांचा सीजन चालू आहे.
प्रशासकीय अधिकाऱ्यांबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, सर्वसामान्यांना किळस यावा अशी या बदल्यात होणाऱ्या आर्थिक व्यवहाराची चर्चा आहे.
सध्या पैसे दिल्याशिवाय कोणत्याही अधिकाऱ्यांच्या बदल्या होत नाही. त्यामुळे बदल्यांपासून भ्रष्टाचाराचे मूळ सुरु होते अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. पैसे देऊन पोस्टिंग घेणारा अधिकारी हा वसूल करायचा प्रयत्न करत असल्याचा घणाघातही त्यांनी केला आहे.
बदल्यांच्या राजकारणाचंही एक वेगळ्या प्रकारे राजकारण केले जात आहे. त्यामुळे हा बदल्यांचा खेळ फक्त अधिकारी आणि राजकारण्यांपर्यंतच मर्यादित राहिला नाही तर याचे दागेधोरे लांबपर्यंत गेले आहेत.
त्याचा फटका जनसामान्यांना बसत आहे. त्यामुळे याचा त्रास आता सर्वसामान्यांना होत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. त्यामुळे प्रशासनात पैसे देऊन आलेला माणूस सामान्यांना वेठीस धरण्याचे काम करत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.
बदलीसाठी एक रुपयाही देणार नाही असा कणखरपणा अधिकाऱ्यानी दाखवला पाहिजे तरच या गोष्टींना आळा बसेल अशा सुचनाही राजू शेट्टी यांनी यावेळी दिल्या आहेत.
बदल्यांची सवय लोकप्रतिनिधींनी लावलेले आहे त्यामुळे साफसफाईची सुरुवात त्यांच्यापासूनच सुरू झाली पाहिजे असा टोलाही त्यांनी राजकारण्यांसह प्रशासनातील अधिकाऱ्यांना लगावला आहे.
भ्रष्टाचारांना सामाजिक अप्रतिष्ठा केल्याशिवाय ही अशी प्रकरणं थांबणार नाहीत म्हणून हा मुद्दा हाती घेतला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
पैसे देऊन बदली केलेले काही अधिकारी चॅलेंज देतात दम असेल तर बदली करून दाखवा त्यामुळे अधिकारी लोकांचे फावते आणि त्याचा फटका जनसामान्यांना बसतो आहे अशी खरमरीत टीकाही त्यांनी केली आहे.
एकही खातं असं नाही की ज्या खात्यात बदलीसाठी पैसे द्यावे लागत नाहीत. भ्रष्टाचाराला सामाजिक प्रतिष्ठा मिळवायला लागली आहे, तेच धोकादायक असल्याचेही तायंनी यावेळी सांगितले.
याबाबत कुणाला काही वाटत असेल तर त्यांनी माझ्यावर तक्रार करावी. मी जाहीर केलेले रेट कार्ड खोटं असेल तर माझ्यावर तक्रार दाखल करावी,अब्रू नुकसानीचा दावा दाखल करावा असं आव्हानही त्यांनी दिलं आहे.
तसेच माझ्या आरोपात तथ्य नसेल तर न्यायालयाप्रमाणे सर्वच बदल्या ऑनलाइन करा असा सल्लाही त्यांन यावेळी दिला आहे.
यावेळी राजू शेट्टी यांनी सांगितले की, पण ही लढाई मी लढणार आहे. त्यानिमित्ताने हा विषय मी चर्चेला आणला आहे. आज या विषयाचा मी पाया घातलाय आज ना उद्या हा विषय ऐरणीवर येईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
उघड उघड सगळे बोलतात की पन्नास खोके एकदम ओके, त्यामुळेच मी पत्रात गुहाटीचा संदर्भ दिला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.