मुंबई: राज्याचे माजी मंत्री रामदास कदम यांचे चिरंजीव आमदार योगेश कदम यांच्या गाडीला अपघात झाला आहे. या अपघातातून सुदैवाने योगेश कदम बचावले आहेत. इंधनाच्या दरात लवकरच कपात होण्याचे संकेत मिळत आहेत. तर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या विरोधात भाजपची अध्यात्मिक आघाडी अजूनही आक्रमक आहे. याशिवाय राज्यातील वेगवेगळ्या शहरात घडणाऱ्या घडामोडींचा या लाईव्ह ब्लॉगमधून आढावा घेणार आहोत. सामाजिक, राजकीय, गुन्हेगारी, अर्थ, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील घडामोडीही इथे वाचायला मिळतील.
मुंबई :
मुंबईतील जामा मशिदीजवळील अब्दुल रहमान स्ट्रीटजवळ दुकानांना आग लागली आहे.
अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 7 ते 8 दुकानांना आग लागली आहे.
ही सर्व दुकाने ग्राउंड प्लस वनची आहेत.
अग्निशमन दलाच्या 10 ते 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
या घटनेत अद्याप कोणीही अडकल्याची माहिती नाही, तसेच कोणीही जखमी झाले नाही.
ज्या ठिकाणी आग लागली ती सर्व दुकाने आहेत, आग कशी लागली याचा तपास अग्निशमन दल आणि पोलीस करत आहेत, अग्निशमन दलाचे पथक आग विझवण्याचे प्रयत्न करत आहेत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा त्याचा गावी भव्य सत्कार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला संभाजी उर्फ मनोहर भिडे
भिडे गुरुजींना मुख्यमंत्र्यांच्या देरे गावात जाऊन भेट घेतलीय
ट्रकमधून अवजड वाहतूक होत असल्याने ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले
ट्रक पलटी होऊन रस्त्याच्या बाजूला कोसळला…
यामुळे रोडकडील विजेचे खांब कोसळले
ट्रक चालक जखमी
एकनाथ शिंदेंनी नुसता दाढीवर हात ठेवला असता तर संजय राऊत आडवे झाले असते गुलाबराव पाटलांची संजय राऊतांवर सडकून टीका,
संजय राऊतांना 41 मते पडली ती एकनाथ शिंदेंमुळे,
आपण पक्ष बाजूला ठेवला , धर्मच टिकला नाही तर तुमचा पक्ष कुठे वाचणार,
हिंदू जन आक्रोश मोर्चादरम्यान बोलताना गुलाबराव पाटलांचा संजय राऊतांवर हल्लाबोल.
टोईंग व्हॅन अडवून घोषणा बाजी देत केले आंदोलन
या टोईंग ची समस्या दिवसेंदिवस वाढत जातं असून योग्य उपाय योजना करण्याची मागणी
गाडी खाली झोपून केले आंदोलन, येत्या काळात समस्या सुटली नाही तर मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याचा स्थानिकांचा इशारा
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज अशा आशयाचे स्टिकर वाहनांवर चिकटवणार
कणकवलीमध्ये आंदोलनाला सुरुवात
काल अजित पवार यांनी पुण्यामध्ये स्वराज्य रक्षक संभाजी राजे अशा आशयाचे स्टिकर वाहनावर लावले होते
त्याच धर्तीवर राष्ट्रवादीला टक्कर देण्यासाठी नितेश राणेंचे धर्मवीर संभाजी राजेंचे स्टिकर
रेड्याच्या वाढदिवसाला होर्डिंग लावून वाढदिवसाचे दिले आमंत्रण,
रेड्याच्या वाढदिवसाला गावोगावाहून आलेल्या 700 पाहुण्यांना जेवण,
नेत्यापेक्षाही मोठा रेड्याच्या वाढदिवसाचा केला साजरा,
औरंगाबाद मधील सुरज नावाच्या रेड्याच्या वाढदिवसाला शंकरलाल पहाडिया यांनी केले जंगी सेलिब्रेशन,
रेड्याच्या खानपाणाला दर महिन्याला बारा हजार रुपये खर्च,
केक कापत पैश्यांची उधळण करत वाढदिवस साजरा.
सुप्रिया सुळेंकडून बारामती मतदारसंघात जोरदार मोर्चेबांधणी सुरू
लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघात संघटनात्मक पक्षाचा आढावा
सुप्रिया सुळेंनी आज खडकवासला मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली
बैठकीत पक्षाचा आढावा घेणार
आगामी महापालिका निवडणुकीच्या संदर्भातही मार्गदर्शन करणार
मतदारसंघातील अडचणी प्रश्न जाणून घेण्यासाठी विधानसभा मतदारसंघात बैठकांचं आयोजन
भाजपनं बारामती लोकसभा मतदारसंघ लक्ष्य केल्यानंतर राष्ट्रवादीही आतापासूनच कामाला लागली आहे
औरंगाबाद शहराला आता तीन दिवसाआड पाणी,
औरंगाबाद खंडपीठाच्या दणक्यानंतर महापालिकेला आली जाग,
महापालिका देणार दर तीन दिवसांनी पाणी,
औरंगाबादच्या पाणीपुरवठ्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल आहे याचिका.
लंपी आजाराबाबत धक्कादायक माहिती समोर
मराठवाड्यातील फक्त चार जिल्ह्यात साडे तीन हजार जनावरांचा मृत्यू
तर तब्बल 52 हजार जनावरांना लंपी आजाराची बाधा
चार जिल्ह्यातील 1499 गावातील साडेतीन हजार जनावरांचा मृत्यू
अजूनही मराठवाड्यात लंपी आजाराची साथ सुरूच
पहाटे 6 वाजल्यापासून अजितदादा करतायेत विकासकामांची पाहणी
बारामती शहर आणि परिसरातील विकासकामांची अजितदादांकडून पाहणी
कामांचा दर्जा राखण्याच्या अधिकारी व ठेकेदारांना सूचना
वेळेत कामे पूर्ण करण्यावर लक्ष देण्याचेही दिले निर्देश
ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने मुसंडी मारली असली तरी ही मुसंडी वगैरे काही नाही
आगामी निवडणुकांमध्ये भाजपाचा धुव्वा उडलयाशिवाय रहाणार नाही
भाजपला साधं अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत उभं राहता आलं नाही
शिंदे- फडणवीस सरकारला निवडणुका घेता येत नाहीत
नगरपालिका, महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका का घेत नाहीत? असा सवालही पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय
याच कचरा आणि पालापाचोळ्याच्या जीवावर तुम्ही खासदार झालात
तुम्ही उद्या राजीनामा द्या, आणि निवडणूक लढवा, लोक तुम्हाला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत
मुख्यमंत्री आणि 40 आमदारांबद्दल यापुढे बोललात तर खपवून घेतले जाणार नाही
संजय राऊत म्हणजे आयजीच्या जीवावर बायजीचा उद्धार, शिवतारेंची संजय राऊतांवर टीका
हिंमत असेल तर 12 तासाच्या आत खासदारकीचा राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे जा, संजय राऊतांना आव्हान
या अपघातात दुचाकीवरील आजोबा व नातवाचा जागीच मृत्यू
भोकर ते उमरी रस्त्यावरील हाळदा गावानजीक उमरीकडून भोकरकडे दोघे जण दुचाकीवरून येत होते.
रात्रीच्यावेळी झाला अपघात
घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक अनिल कांबळे दाखल झाले होते
याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला