Deglur Biloli Bypoll Election Result : नांदेडमधील देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानानंतर आज मतमोजणी पार पडली आहे. आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली होती. या निवडणुकीत 64.95 % इतकं मतदान झालं होतं.या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे.
काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनानंतर देगलूरमध्ये पोटनिवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत एकूण 12 उमेदवार रिंगणात होते. असं असलं तरी 3 पक्षात प्रामुख्याने ही लढत झाली. या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली होती. कारण संपूर्ण महिनाभर मंत्री अशोक चव्हाण देगलूर बिलोलीमध्ये तळ ठोकून होते. तर भाजपनेही ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. भाजपचे अनेक नेते आमदार पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण देगलूरमध्ये जीवाचं रान करुन प्रचार केला होता.
अनुसुचित जातीसाठी आरक्षित असणाऱ्या या मतदारसंघात काँग्रेसकडून जितेश अंतापूरकर (jitesh antapurkar), भाजपचे उमेदवार सुभाष साबणे (Subhash Sabane) तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. उत्तम रामराव इंगोले निवडणूक रिंगणात होते.
देगलूर विधानसभा पोटनिवडणूक निकाल
देगलूरची जागा काँग्रसेचे जिंकली
काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर विजयी
41933 मतांनी जितेश अंतापूरकर विजयी
मवीआ – जितेश अंतापूरकर 108840
भाजपा – सुभाष साबणे 66907
काँग्रेस – 41933 मतांनी जितेश अंतापूरकर विजयी
देगलूर विधानसभा निवडणुकीत जनतेने दिलेला कौल आम्ही मान्य करतो असे भाजपाचे उमेदवार सुभाष साबणे यांनी म्हंटल आहे, पराभवाने खचून न जाता भाजपातच राहून पुन्हा जोमाने कामाला लागू असं सुभाष साबणे म्हणाले.
देगलूर पोटनिवडणूक मतमोजणी
▪️एकोणत्तीसावी फेरी 29 (जिमाका)
1 ) श्री. जितेश रावसाहेब अंतापूरकर
(इंडियन नॅशनल कॉग्रेस)
:- 107329
2) श्री. सुभाष पिराजीराव साबणे
(भारतीय जनता पार्टी)
:- 65772
3) श्री. उत्तम रामराव इंगोले
(वंचित बहुजन आघाडी)
:- 11097
▪️अंतापूरकर 41हजार 557 मतांनी आघाडीवर.
या निवडणुकीच्या निमित्तानं एक सरकारात्मक वातावरण निर्माण झालं आहे. हिमाचल प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रात काँग्रेसनं जागा राखल्या आहेत. हा विजय आहे हा महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचा संयुक्त विजय आहे. भाजपच्या प्रचाराला देगलूरच्या जनतेनं साथ दिली नाही. आमचा अजेंजा विकासाचा होता. पालकमंत्री या नात्यानं मी विकासासाठी प्रयत्नशील राहीन. हा विजय काँग्रेसचा असून महाविकास आघाडीचा देखील आहे. विकासाच्या विचाराला जनतेनं साथ दिली आहे, असं अशोक चव्हाण म्हणाले. एकदंरीत ज्या पद्धतीनं कारवाई करुन वातावरण निर्माण केलं जातंय. ते पाहता हे दुर्दैवी असल्याचं अशोक चव्हाण म्हणाले.
जितेश अंतापूरकर यांनी माझा विजय हा महाविकास आघाडीचा विजय आहे. माझ्या वडिलांच्या निधनानंतर मला जनतेने भरभरून प्रेम दिलं त्यामुळे मी निवडून येऊ शकलो. मतदार संघाच्या विकासाचं माझ्या वडिलांनी स्वप्न पाहिलं होतं ते मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन, असं जितेश अंतापूरकर म्हणाले.
देगलूर पोटनिवडणूक मतमोजणी
▪️सव्वीसावी फेरी 26 (जिमाका)
1 ) श्री. जितेश रावसाहेब अंतापूरकर
(इंडियन नॅशनल कॉग्रेस)
:- 97157
2) श्री. सुभाष पिराजीराव साबणे
(भारतीय जनता पार्टी)
:- 59031
3) श्री. उत्तम रामराव इंगोले
(वंचित बहुजन आघाडी)
:- 10466
▪️अंतापूरकर 38126 मतांनी आघाडीवर.
देगलूर पोटनिवडणूक मतमोजणी
▪️पंचेसावी फेरी
1 ) श्री. जितेश रावसाहेब अंतापूरकर
(इंडियन नॅशनल कॉग्रेस)
:- 94221
2) श्री. सुभाष पिराजीराव साबणे
(भारतीय जनता पार्टी)
:- 56959
3) श्री. उत्तम रामराव इंगोले
(वंचित बहुजन आघाडी)
:- 10389
▪️अंतापूरकर 37262 मतांनी आघाडीवर.
देगलूर पोटनिवडणूक मतमोजणी
▪️चोवीसावी फेरी (जिमाका)
1 ) श्री. जितेश रावसाहेब अंतापूरकर
(इंडियन नॅशनल कॉग्रेस)
:- 90421
2) श्री. सुभाष पिराजीराव साबणे
(भारतीय जनता पार्टी)
:- 54626
3) श्री. उत्तम रामराव इंगोले
(वंचित बहुजन आघाडी)
:- 10201
▪️अंतापूरकर 35795 मतांनी आघाडीवर.
देगलूर पोटनिवडणूक मतमोजणी
▪️तेविसावी फेरी (जिमाका)
1 ) श्री. जितेश रावसाहेब अंतापूरकर
(इंडियन नॅशनल कॉग्रेस)
:- 86850
2) श्री. सुभाष पिराजीराव साबणे
(भारतीय जनता पार्टी)
:- 52425
3) श्री. उत्तम रामराव इंगोले
(वंचित बहुजन आघाडी)
:- 9841
एकविसावी फेरी
1 ) श्री. जितेश रावसाहेब अंतापूरकर
(इंडियन नॅशनल कॉग्रेस) :- 78923
2) श्री. सुभाष पिराजीराव साबणे
(भारतीय जनता पार्टी) :- 48657
3) श्री. उत्तम रामराव इंगोले
(वंचित बहुजन आघाडी) :-8856
▪️अंतापूरकर 30266 मतांनी आघाडीवर.
देगलूर पोटनिवडणूक मतमोजणी
▪️20 व्या फेरीअखेर काय परिस्थिती?
1 ) श्री. जितेश रावसाहेब अंतापूरकर
(इंडियन नॅशनल कॉग्रेस) :- 74821
2) श्री. सुभाष पिराजीराव साबणे
(भारतीय जनता पार्टी) :- 47058
3) श्री. उत्तम रामराव इंगोले
(वंचित बहुजन आघाडी) :- 8019
▪️अंतापूरकर 27763 मतांनी आघाडीवर.
1 ) श्री. जितेश रावसाहेब अंतापूरकर
(इंडियन नॅशनल कॉग्रेस) :-70675
2) श्री. सुभाष पिराजीराव साबणे
(भारतीय जनता पार्टी) :- 45452
3) श्री. उत्तम रामराव इंगोले
(वंचित बहुजन आघाडी) :- 7668
▪️अंतापूरकर 25 हजार 223 मतांनी आघाडीवर
1 ) जितेश रावसाहेब अंतापूरकर
(इंडियन नॅशनल कॉग्रेस) :- 52599
2) श्री. सुभाष पिराजीराव साबणे
(भारतीय जनता पार्टी) :- 34857
3) श्री. उत्तम रामराव इंगोले
(वंचित बहुजन आघाडी) :- 5059
▪️अंतापूरकर 17742 मतांनी आघाडीवर
देगलूर पोटनिवडणूक मतमोजणी
1 )श्री. जितेश रावसाहेब अंतापूरकर
(इंडियन नॅशनल कॉग्रेस) :- 48530
2) श्री. सुभाष पिराजीराव साबणे
(भारतीय जनता पार्टी) :- 32292
3) श्री. उत्तम रामराव इंगोले
(वंचित बहुजन आघाडी) :- 5059
▪️अंतापूरकर 16238 मतांनी आघाडीवर
▪️बारावी फेरी
काँग्रेस जितेश अंतापूरकर – 44344
भाजप सुभाष साबणे – 30169
वंचित डॉ. उत्तम इंगोले – 4464
▪️अंतापूरकर 14175 मतांनी आघाडीवर
▪️अकरावी फेरी
काँग्रेस जितेश अंतापूरकर – 40523
भाजप सुभाष साबणे – 27943
वंचित डॉ. उत्तम इंगोले – 4047
▪️अंतापूरकर 12580 मतांनी आघाडीवर
देगलूर पोटनिवडणूक मतमोजणी
▪️ दहावी फेरी
काँग्रेस जितेश अंतापूरकर – 36592
भाजप सुभाष साबणे – 25623
वंचित डॉ. उत्तम इंगोले – 3560
▪️जितेश अंतापूरकर 10969 मतांनी आघाडीवर
देगलूर पोटनिवडणूक मतमोजणी
▪️नववी फेरी-
काँग्रेस जितेश अंतापूरकर – 33068
भाजप सुभाष साबणे – 22486
वंचित डॉ. उत्तम इंगोले – 3022
काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 10582 मतांनी आघाडीवर
देगलूर मतमोजणी सातव्या फेरी अखेर
काँग्रेस (जितेश अंतापूरकर)- 25376
भाजप (सुभाष साबणे) – 17164
वंचित (डॉ. उत्तमराव इंगोले)- 2257
१.जितेश अंतपुरकर (काँग्रेस)- 4085
२.सुभाष साबणे (भाजप)- 2487
३.डॉ. उत्तम इंगोले (वंचित)- 335
काँग्रेस उमेदवार अंतापूरकर 7768 मतांनी आघाडीवर
एकूण मते-
काँग्रेस 22332
भाजप 14564
वंचित- 1840
पाचव्या फेरी अखेर मिळालेली एकूण मते
जितेश अंतापूरकर काँग्रेस – 18245
सुभाष साबणे भाजप- 12077
डॉ. उत्तमराव इंगोले वंचित-1505
अंतापूरकर 6168 ने आघाडीवर
चौथ्या फेरीतील मते
अंतापूरकर – 3788
साबणे – 2495
इंगोले – 352
अंतापूरकर यांना 1293 चे मताधिक्य.
अंतापूरकर 4557 मतांनी आघाडीवर आहेत.
चौथ्या फेरीअखेरची मतमोजणी
काँग्रेस -14500
भाजप- 10243
वंचित- 1225
तिसऱ्या फेरी अखेर काँग्रेसला मिळालेली एकूण मते 10712, तर भाजप 7448 मते
तिसऱ्या फेरी अखेर काय स्थिती?
१.जितेश अंतपुरकर (काँग्रेस)- 3418
२.सुभाष साबणे (भाजप)-2447
३.डॉ उत्तम इंगोले (वंचित)- 104
तिसऱ्या फेरीत काँग्रेसला 971 मतांची आघाडी
जितेश अंतापूरकर 2293 मतांनी आघाडीवर.
अंतापूरकर पहिल्या फेरीत 1624 मतांनी आघाडीवर होते.
दोन्ही फेरीत मिळून 3926 मतांनी जितेश अंतापूरकर आघाडीवर आहेत.
जितेश अंतापूरकर – 4216
सुभाष साबणे – 2592
डॉ. उत्तमराव इंगोले – 320
अंतापूरकर 1624 मतांनी आघाडीवर आहेत.
देगलूरची जागा कोण जिंकणार? हे वंचितचा उमेदवार ठरवणार आहे. देगलूरमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप अशी सरळसरळ लढत होत असली तरी वंचितच्या डॉ. इंगोले यांचा मोठा प्रभाव आहे. ते किती मतदान मिळवतात, यावर अंतापूरकर आणि साबणे यांचा विजय निश्चित होईल.
14 टेबलवर 30 फेऱ्यांची ही मतमोजणी होईल. या निवडणुकीत 64.95 % इतकं मतदान झालं. एकूण 2 लाख 98 हजार 535 मतदारांपैकी 1 लाख 90 हजार 800 इतक्या जणांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण 12 उमेदवार रिंगणात आहेत. दुपारी 1 च्या आसपास देगलूरचा पुढचा आमदार कोण, हे चित्र स्पष्ट होईल.
देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणूकीच्या मतमोजणीला आता सुरुवात होतेय. देगलूर इथल्या तहसील कार्यालयात ही मतमोजणी होतेय. त्याकरिता देगलूर शहरात कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलाय. देगलूर शहरातील साठे चौक ते नगरपरिषद कार्यालय हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलाय.