मुंबई : राज्यसरकारने आंतरधर्मीय विवाह समिती स्थापन केली आहे. त्यामुळे आंतरधर्मीय विवाह करताना राज्य सरकारला कळवणं बंधनकारक करण्यात आलं आहे. त्यामुळे वादंग निर्माण झालं असून त्याविरोधात प्रतिक्रिया उमटत आहेत. आजही त्यावर प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. तसेच उद्या शनिवारी महाविकास आघाडीचा मुंबईत महामोर्चा निघणार आहे. या महामोर्चाला राज्य सरकारने अद्याप परवानगी दिलेली नाही. त्याबाबतही आज काही निर्णय होण्याची शक्यता आहे. या मोठ्या बातम्यांसह महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या न्यायालयीन लढ्याच्या अपडेट्ससह राज्यातील इतरही महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आणि ताज्या बातम्यांचा आढावा लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.
पुण्यात नव्याने पदभार घेतलेल्या पोलीस आयुक्तांना गुन्हेगारांची सलामी
वारजे भागात असणाऱ्या वेताळबाबा चौकात फरार आरोपीने हवेत केला गोळीबार
रामनगर भागात असणाऱ्या एका फरार आरोपी हवेत गोळीबार करून पसार झाला
घटनास्थळी पोलीस उपायुक्त सुहेल शर्मा यांच्यासह वरिष्ठ पोलीस निरीक्षक दगडू हाके दाखल
गोळीबार नेमका कशामुळे केला याची अद्याप माहिती नाही
Marathi News LIVE Update
ऑनलाईन गेमिंगसाठी मोजावी लागू शकते जास्त रक्कम
जीएसटी परिषदेच्या निर्णयानंतर गेमिंगवरचा टॅक्स महागणार
सध्या गेमिंग पोर्टलवर 18 टक्के द्यावा लागतो जीएसटी
आता 28 टक्के जीएसटी लागण्याची शक्यता
मंत्र्यांच्या समितीने जीएसटी परिषदेकडे सोपविला अहवाल
अर्थमंत्री निर्मला सीतारमण उद्या घेऊ शकतात निर्णय
Marathi News LIVE Update
उद्या होणाऱ्या महामोर्चासाठी मविआकडून जोरदार तयारी
ठाकरे गटाकडून टी-शर्ट तयार करण्यात आले
मोर्चात सहभाग घेणाऱ्या देण्यात येणार टी-शर्ट
17 डिसेंबर रोजी होणाऱ्या महामोर्चाला पोलिसांकडून परवानगी
मुंबई पोलिसांकडून मोर्चाला लिखित परवानगी
भायखडा येथील पोलीस ठाण्यातून परवानगी
अटी, शर्टींसह ही परवानगी देण्यात आली
शिष्टमंडळाच्या भेटीनंतर पोलिसांकडून परवानगी
अनिल परब
आमचा मोर्चा उद्या मोठ्या प्रमाणात होणार आहे
याच अनुषंगाने आता तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यात करण्यात आहे
महाराष्ट्र महाराष्ट्रातून आणि मुंबईतून नागरिक येणार आहेत
यांची सोय देखील करण्यात आलेली आहे
विरोधकांना आंदोलन करायचे त्यांनी करावं मात्र आमच्याकडे कायदा आणि सुव्यवस्था आहेच
कुठलाही प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांनी घेतली आहे
नाशिक
शिंदे गटात प्रवेश केलेल्या माजी नगरसेवकांचे होणार नाशिकमध्ये जोरदार स्वागत
नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात स्वागताची जोरदार तयारी
ढोल ताशांच्या गजरात केलं जाणार स्वागत
शेकडो कार्यकर्ते पाथर्डी फाट्यावर जमले
कोल्हापूर
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने देसाई यांच्या समोर घोषणाबाजी
समितीकडून शंभूराज देसाई यांना दिले मागणीचे निवेदन
अधिवेशन संपलं की तातडीने आम्ही चर्चा करून बेळगावात येऊ
जाणून बुजून मराठी माणसाला त्रास दिला जातोय
नाशिक : बहुचर्चित विपीन बाफणा खून प्रकरणातील आरोपींना अखेर शिक्षा सुनावली
अमन जट आणि चेतन पगारे या दोघांना फाशीची शिक्षा सुनावली
2013 मध्ये एक कोटीच्या खंडणीसाठी विपीन बाफना या तरुणाचे केले होते अपहरण
तरुणाचे अपहरण करून हत्या करून केले होते मोबाईलमध्ये चित्रीकरण
कोल्हापूर
शंभूराज देसाई
ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारात या डोंगराळ भागात मंत्री कशासाठी हा प्रश्न पडला असेल
पण मी सुद्धा डोंगराळ भागातील असल्यामुळे इथल्या समश्यांची जाणीव आहे
बाळासाहेबांची शिवसेना या भागात 20 ते 25 ग्रामपंचायत निवडणुका लढवत आहे
जो विचार बाळासाहेबांचा होता या पासून शिवसेना दूर जाते का अशी परिस्थिती गेली अडीच वर्ष होती
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते पण सगळे निर्णय अजितदादा घेत होते
तोंड दाबून बुक्यांचा मार आम्हाला सहन करावा लागत होतो
18/19 तास काम करणारा मुख्यमंत्री महाराष्ट्रला मिळाला आहे
न थकता शिंदे साहेब काम करत आहेत
या भागात जलसंधरण सह अनेक काम करायची आहेंत
प्रचारासाठी मंत्री गावात येत असेल तर सत्ता दिलात तर कामासाठी मुंबईला जावं लागणार नाही
शिंदे साहबंच विशेष लक्ष चंदगड आणि सीमा भागाकडे आहे
सीमा भागातील 830 गाव मराठी भाषिक आहेत
या सर्वांना महाराष्ट्रात यायचं आहे
सीमा प्रश्न समन्वयाने सोडवाण्यासाठी केंद्राची पावल पडत आहेत
2020 पासून सीमा भागातील योजना बंद झाल्या पैसे दिले नाहीत
त्यावेळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कोण होत
त्यावेळी निधीची तरतूद का नाही केली
निर्मळ मनाने आम्ही 6 तारखेला बेळगांव ला जायचं ठरवलं होत
आमच्यामुळे कुठेही गालबोट लागू नये म्हणून दौरा पुढे ढकलले
आम्हाला पळपुटे भित्रे आहेत असा आरोप विरोधकांनी केला
मात्र बाळासाहेबांचा शिवसैनिक पळपुटा नाही
तो छातीचा कोट करून पुढे उभा असतो
मराठी भाषिकांना आणखी काय हवं आहे याची कल्पना आम्ही दोन्ही मंत्री अधिवेशना नंतर चर्चा करू
या तालुक्याच आणि देसाई घराण्याच तीन पिढ्याचं नातं आहे
पुणे
शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीची टीका करणाऱ्या महीले विरोधात गुन्हा दाखल करा
पुण्याची माजी महापौर अंकुश काकडे यांची डेक्कन पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद
पुण्यातील अनघा घैसास या महिलेने सोशल मीडियावर शरद पवार यांच्यावर केलेल्या पिके वरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये दिली फिर्याद
महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी
महिलेने शरद पवार साहेबांची बदनामी करून आमच्या भावना दुखावल्या असल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांचा आरोप
Marathi News LIVE Update
महाविकास आघाडीच्या महामोर्चाला परवानगी
मुंबईत होणाऱ्या मोर्चाला पोलिसांनी लिखित परवानगी दिली
मविआ शिष्टमंडळ मुंबई पोलिसांच्या भेटीला
17 डिसेंबर रोजी मुंबईत महाविकास आघाडीचा मोर्चा
टीम इंडियाने बांग्लादेशला विजयासाठी 513 धावांच लक्ष्य दिलं आहे. तिसऱ्या दिवसअखेर बांग्लादेशने बिनबाद 42 धावा केल्या आहेत. नजमुल शंटो 25 आणि जाकीर हसन 17 धावांवर खेळतोय. बांग्लादेशची टीम 471 धावांनी पिछाडीवर आहे.
जळगाव : महाविकास आघाडीच्या मोर्चावर कोणतीही बंदी आणलेली नाही, बंदी असली तरी मोर्चा काढता येतो.
महाविकास आघाडीने शिवसेनेची स्टाईल शिकावी असा टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला
शिंदे सरकारकडून महाविकास आघाडीच्या मोर्चावर बंदी आणली जात असल्याचा आरोप राऊत यांनी केला होता.
उद्याच्या मोर्च्यात महाराष्ट्रप्रेमींनी सहभागी व्हावं
खासदार संजय राऊत यांनी केलं आवाहन
महापुरुषांचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही
कर्नाटकातील मराठी बांधवांवर अन्याच सुरूच
४ लाख कोटींचे उद्योग महाराष्ट्राबाहेर गेलेत
अडीच लाख लोकांचा रोजगार बुडाला
संजय राऊत यांचा राज्य सरकारवर निशाणा
चटोग्राम येथे बांग्लादेश विरुद्ध कसोटी सामना सुरु आहे. टीम इंडियाने पहिल्या कसोटीचा दुसरा डाव 2 बाद 258 धावांवर घोषित केला. टीम इंडियाने बांग्लादेशला विजयासाठी 513 धावांच लक्ष्य दिलं आहे.
टीम इंडियाचा फलंदाज चेतेश्वर पुजाराने कसोटी क्रिकेटमध्ये बऱ्याच काळानंतर शतक ठोकलय. 2019 नंतर पुजाराने झळकावलेलं हे पहिलं शतक आहे. पहिल्या डावात पुजाराची शतकाची संधी हुकली होती. पुजाराने 130 चेंडूत नाबाद 102 धावा फटकावल्या.
LIVE UPDATE
सोलापूर
– भाजपा नगरसेवकाचा सोलापूर बंदला पाठिंबा
– भाजपचे नगरसेवक सुनील कामाठीने दर्शवला बंदला पाठिंबा
– आजच्या सोलापूर बंदला भाजपचा होता विरोध
– राज्यपाल भगतसिंग कोश्यारीचा निषेध करत बंदला दिला पाठिंबा
– राज्यपाल कोश्यारी यांनी असे विधान करायला नको होते
नाशिक लाचलूचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई
महावितरणचे दोन अधिकारी आणि एक लिपिक ताब्यात
डीपी, मीटर कनेक्शन बाबत परवानगी देण्यासाठी ठेकेदाराकडे साडे सहा हजारांची मागितली होती लाच
महावितरण विभाग एकच्या कार्यालयात नाशिक लाचलूचपत प्रतिबंधक विभागाची आज सकाळी कारवाई
18 तारखेला मतदान तर 20 रोजी मतमोजणी
परभणी जिल्ह्यातील 128 ग्रामपंचायत साठी मतदान होणार
1 ग्रामपंचायतीवर ओबीसी आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने तेथे निवडणूक रद्द करण्यात आली आहे
तर 8 ग्रामपंचायती ह्या बिनविरोध निवडून आल्या आहेत.
जळगाव
गुलाबराव पाटील बाईट ऑन सुषमा अंधारे
सुषमा अंधारे यांना बोललेला नटी हा माझा शब्द वाईट नव्हता – गुलाबराव पाटील
ताई कशी काय बोलते ग देवांवर.. थोडी लाज शरम ठेवा
मी नटी म्हटलं तर केवढा चालवला पण माझा मनात पाप नव्हता मी भावनेच्या आहारी बोललो
जळगाव
गुलाबराव पाटील बाईट ऑन ठाकरे
देवी देवतांवर महापुरुषांवर व साधू संतांवर टीका करत आहात पाप भरावा लागेल… गुलाबराव पाटलांचा नाव न घेता ठाकरेंना टोला
देवतांवर महापुरुषांवर व साधुसंतांवर टीका करणारे चांगले वक्ते त्यांच्याकडे असल्याने त्यांच्याकडे लोक कसे राहतील
मी कपाळी लावलेला टिळा हा छत्रपतींमुळे तुम्ही छत्रपतींवर टीका करतात पाप भरावा लागेल
बांग्लादेश विरुद्ध दुसऱ्या डावात टीम इंडियाने जबरदस्त सुरुवात केली. कॅप्टन केएल राहुल 23 धावांवर आऊट झाला. पण शुभमन गिलने 110 शतक ठोकलं. टीम इंडियाने 2 विकेट गमावून 200 धावांचा टप्पा पार केला आहे. चेतेश्वर पुजारा, विराट कोहलीची जोडी मैदानात आहे. टीम इंडियाकडे आता 450 पेक्षा जास्त धावांची आघाडी आहे.
चटोग्राम टेस्टमध्ये बांग्लादेश विरुद्ध दुसऱ्या डावात सलामीवीर शुभमन गिलने शानदार शतक ठोकलं. कसोटी क्रिकेटमधील त्याचं हे पहिलं शतक आहे. शुभमन गिलने 152 चेंडूत 110 धावा केल्या. यात 10 चौकार आणि 3 षटकार आहेत. मेहदी हसन मिराजच्या गोलंदाजीवर तो बाद झाला.
नवी मुंबईतील उलवे परिसरातून कोट्यवधींचे ड्रग्ज जप्त
मुंबई एनसीबी आणि चेन्नई एनसीबीची संयुक्त कारवाई
जप्त केलेल्या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत 1 कोटी रुपयांहून अधिक किंमत
नाशिक : ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेल्या अजय बोरस्ते यांचे नाव झाकले
शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या नामफलकावरील नाव झाकले
शिंदे गटात गेलेल्या अजय बोरस्ते यांच्या नावावर चिटकवले स्टिकर
दादा भुसे, हेमंत गोडसे, सुहास कांदे, यांच्यानंतर अजय बोरस्ते यांचं नाव बोर्डावरून हटववले
ठाकरे गटात असलेल्या जिल्ह्यातील सर्वच पदाधिकाऱ्यांचे नावे असलेल्या बोर्डवर लावली स्टिकर
विषारी दारू प्यायल्यानंतर मृत्यू झालेल्यांना कोणतीही भरपाई नाही
जो दारू पिणार, तो मरणारच.. असं आवाहन आम्ही करतच आहोत
जे दारू पिण्याच्या बाजूने बोलत असतील, त्यांचं काही भलं होणार नाही
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचं विधानसभेत वक्तव्य
#WATCH | “No compensation will be given to people who died after drinking…We have been appealing- if you drink, you will die…those who talk in favour of drinking will not bring any good to you…”, said CM Nitish Kumar in assembly earlier today.
(Source: Bihar Assembly) pic.twitter.com/zquukNtRIA
— ANI (@ANI) December 16, 2022
भाजप कार्यकर्त्यांकडून पोलिसांनाच दमदाटी आणि शिवीगाळ
पुण्यातील बिबवेवाडी पोलीस स्टेशनमधील घटना
बर्थडे पार्टीमध्ये गोंधळ का घातला अशी विचारणा केली असता भाजप कार्यकर्त्यांनी काढला पोलीस स्टेशनवरच मोर्चा
पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी केलेली कारवाई चुकीची म्हणत भाजप कार्यकर्त्यांचा पोलीस स्टेशन समोर राडा
मात्र माझा राजीनामा घेण्याआधी राज्यपालांचा राजीनामा घेणार का?
राजकीय सुडापोटी माझ्यावर आरोप केला जातोय,
माझ्यामागे ईडी लावता येत नाही म्हणून धार्मिक वाद पेटवण्याचा हा प्रयत्न आहे- सुषमा अंधारे
येत्या हिवाळी अधिवेशनात शेतकरी आत्महत्येचा मुद्दा गाजण्याची शक्यता
अनेक भागात शेतकऱ्यांना मदत मिळत नसल्याने शेतकरी नैराश्याने आत्महत्या करत आहेत
एकट्या यवतमाळ जिल्ह्यात 5 महिन्यात 200 हून अधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या
मनसे जिल्हा अध्यक्ष राजेश लूटे गंभीर जखमी
जुन्या वैमनस्यातून हल्ला झाल्याची माहिती
ठाण्यातील कॅडबरी ब्रिज वर मोठ्या प्रमाणात डिझेल पडले होते.
यामुळे या ब्रिजवरील वाहतूक बंद करण्यात आली
आपत्ती व्यवस्थापन व अन्गिशमन विभागाकडून पाणी व माती टाकण्याचे काम सुरु आहे..
बीड : चित्रा वाघ यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा स्वीकृत,
शिरूर कासार न्यायालयाने दावा केला स्वीकृत,
राष्ट्रवादी नेते महेबूब शेख यांच्याकडून दावा दाखल,
बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी शेख यांच्याकडून दावा दाखल.
रत्नागिरी आज साजरा केला जातोय रत्नांचा सागर विकासाचा जागर,
मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी रत्न नगरी नटली
मारूती मंदीर परिसर आणि शिवाजी चौक परिसरात आकर्षक सजावट आणि रोषणाई
मंत्री एकनाथ शिंदे येणार असल्याने संपूर्ण रत्नागिरी शहराला बॅनर आणि पोस्टर तसेच भगव्या झेंड्यांनी सजवण्यात आलंय
तारांगण, पाणीपुरवठा, स्वच्छता, गृह विभाग, क्रीडा विभाग, विमान पत्तन, उद्योग विभाग, नगर विकास विभाग, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, जलसंधारण इत्यादी कामांच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण आणि उद्घाटन
कोल्हापुरात भाजप कार्यकर्त्यांनी केलं चंद्रकांतदादांचा जंगी स्वागत
पहाटे कोल्हापूर रेल्वे स्थानकावर केलं स्वागत
चंद्रकांतदादांनी दिल्या महापुरुषांच्या विजयाच्या घोषणा
दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या स्वागताच्या बॅनर्सनी शहर सजलं
एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी अनेक ठिकाणी बॅनर्स आणि होर्डिंग्ज
चौकाचौकात गुढी उभारल्या, शहरातील वातावरण भगवमय
औरंगाबाद जिल्ह्यात गोवरचे आतापर्यंत 196 संशयित रुग्ण
औरंगाबाद शहरात राबवली जात आहे तातडीने लसीकरण मोहीम
बुधवारी शहरात 19 गोवर संशयित रुग्णांची वाढ
गोवरच्या बालकांची दिवसेंदिवस वाढत आहे संख्या
कोल्हापुरातील बालिंगा-पाडळी रस्त्यावर अंधश्रद्धेचं पीक
भीतीनं शाळेला जाण्यास गावातील मुलींचा नकार
हळद कुंकू, लिंबूला टोचलेल्या टाचण्या, हिरवं कापड आणि संबधित मुलीचा फोटो असा उतारा ठेवला
मुलींना वशीकरण करण्यासाठी उतारा ठेवल्याची भागात चर्चा
बीडमध्ये एका हॉटेलच्या उद्घाटनात गोंधळ
परळी रोडवरील कार्यक्रमात मोठा गोंधळ
संपूर्ण वाहतूक झाली होती ठप्प
केवळ साडेतीन मिनिट गौतमी पाटील यांचं नृत्य
गोंधळामुळे एक तास वाहतूक खोळंबल्याने गौतमी पाटील यांनी नृत्य थांबविलं होतं
ठाकरे गटाचे 15 ते 17 माजी नगरसेवक करणार बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी होणार हा पक्ष प्रवेश
सर्व माजी नगरसेवक वर्षावर दाखल
मध्यवर्ती पोलिसांनी विठ्ठलवाडी शाखेतून घेतलं ताब्यात
ताब्यात घेण्यामागचं कारण अजूनही अस्पष्ट
पोलिसांकडून चौधरींच्या कुटुंबीयांनाही काहीही माहिती नाही
राजकीय दबावातून कारवाईचा शिवसेनेचा आरोप
नागपूरच्या गणेशपेठ आगरातून काल रात्री 9 वाजता निघाली होती नागपूर-शिर्डी एसटी बस
केवळ आठ तासात नागपूर ते शिर्डी 540 किलोमीटर अंतर कापत बस पोहचली शिर्डीला
पहिल्या दिवशी 21 प्रवाशांनी केला नागपूर शिर्डी प्रवास