मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज करणार दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेच्या पहिल्या फेजचं उद्घाटन. महिला टी 20 क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत आज टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान दरम्यान लढत होणार आहे. यासह महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये घडामोडी घडत आहेत. या सगळ्या घडामोडींचा या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.
कन्नड घाटातील वळणावर ट्रक आडवा झाला
ट्रकमधून मोठ्या प्रमाणावर डिझेलची गळती
कन्नड घाटात वाहनांच्या चार ते पाच किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा
जीव मुठीत घेऊन वाहनधारकांचा घाटातून प्रवास
बुलढाणा पोलिसांनी केले होते न्यायालयात हजर
अमानुष मारहाणीचे व्हिडीओ शूट न्यायालयात सादर
पोलिसांची दडपशाही असल्याचा न्यायालयाचा संशय
आरोपींची करण्यात आली मेडिकल चाचणी
कसबा पोटनिवडणुकीसाठी केंद्रीय पोलिसांच्या तुकड्या तैनात केल्या जाणार
जवळपास 300 केंद्रीय पोलीस निवडणूक काळात करणार बंदोबस्त
सीएस एफ, आयटीबीपी, रेल्वे पोलीस अशा विभागाचे कर्मचारी असणार तैनात
उद्यापर्यंत सगळे कर्मचारी पुण्यात दाखल होणार
अमित शहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर उद्यापासून केंद्रीय पोलिसांची असणार गस्त
नाना पटोले यांचा कसब्याच्या निवडणुकीवरून पोलीस अधिकाऱ्यांना फोन
झेंडे, पोस्टर्सच्या वादावरून पटोले यांनी डीसीपी गिल यांना फोन केला
तुमच्या इन्सपेक्टर्सना सांगा त्रास देवू नका – नाना पटोले
मला आडव्या हाताने घेता येत असल्याचंही सुनावलं
वाशिम : पोहरादेवी येथे १५ मंत्र्यांची उपस्थिती
संत सेवालाल महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण
शिंदे-फडणवीस यांच्या हस्ते सेवा ध्वजाचे अनावरण
वाशिम येथे ५९३ कोटी रुपयांच्या विकासाचा आराखडा
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना वाजवला नगारा
18 आणि 19 ला करणार अमित शाह पुणे दौऱ्यावर येणार
18 तारखेला ‘मोदी @20’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहणार
भाजपकडून या कार्यक्रमाची जोरदार तयारी
19 तारखेला शिवसृष्टी प्रकल्पाचं उद्घाटन
भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची माहिती
धनंजय मुंडे हे आपल्या मतदार संघ परळी येथे दाखल
अपघातानंतर तब्बल 40 दिवसांनंतर धनंजय मुंडे परतले परळी येथे
मोठ्या प्रमाणात स्वागतासाठी कार्यकर्ते उपस्थित
परळी येथे आज संध्याकाळी धनंजय मुंडे यांची होणार भव्य स्वागत यात्रा
पुणे : त्यासाठी सर्वांनी ताकत लावा,
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांना आदेश,
मुख्यमंत्र्यांनी कालच्या पुणे दौऱ्यात शिंदे गटातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी केली चर्चा,
कसब्यातील सेनेची मतं भाजपला कशी वळतील यासाठी प्रयन्त करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना,
मुख्यमंत्री स्वतः कसब्यात, चिंचवडमध्ये रोड शो आणि जाहीर सभा घेणार.
जळगावमध्ये राज्यपालांच्या राजीनामाचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून पेढे वाटून जल्लोष
भगतसिंग कोश्यारी यांची वेशभूषा धारण करून काढण्यात आली जल्लोष यात्रा
प्रतिकात्मक वेशभूषा धारण केलेल्या राज्यपालांना गुलाब पुष्प देऊन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिला निरोप
बदलापूर एमआयडीसीत रासायनिक कंपनीला भीषण आग
बदलापूर, अंबरनाथ, एमआयडीसी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना
१० किमी लांब असलेल्या अंबरनाथ शहरातून दिसतायत धुराचे लोट
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू
पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या कुटुंबाला 25 लाखाची मदत जाहीर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली मदत जाहीर
पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती
अमित शाह यांचा महाराष्ट्र दौरा आगामी महापालिका निवडणुका आणि 2024 च्या लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन आहे. महाराष्ट्रात भाजपची ताकद वाढवण्यासाठी करावी लागणाऱ्या तयारीचा आढावा ते घेणार आहेत…सविस्तर वाचा
क्रेनच्या सहाय्याने हार घालत जेसीबीद्वारे पुष्पवृष्टी करण्यात येणार
त्याचबरोबर गहिनीनाथ गडावर आमदार धनंजय मुंडे यांची पेढ्याने तुला करण्यात येणार
धनंजय मुंडे हे सहकुटुंब मुंबईहून गहिनीनाथ गडावर दर्शनासाठी येणार
गहिनीनाथ महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर ते परळीच्या दिशेने रवाना होणार
जळगाव : राज्यपालांची मानसिकता राजीनामा देण्याची होती,
त्यांची वेळ पण संपलेली होती,
लोकांचा रोष ओढून घेण्यापेक्षा त्यांनी राजीनामा दिला,
त्यांच्याकडून ती चांगले कामे झाली त्याबद्दल त्यांचे आभार,
त्यांच्याकडून काही गोष्टी झाल्या असतील , पण पुढच्या काळामध्ये असं होऊ नये,
कोणीही महाराजांच्या बाबतीत चुकीचे वक्तव्य करू नये एवढीच अपेक्षा.
जळगाव : लाठी चार्ज करणे चुकीचे पण अतिरेक पण कठीण आहे,
आंदोलन करायला बरेच मार्ग पण नोटंकी आंदोलन पसंत नाही,
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भाव चढ-उतार असल्याने शेतकऱ्याच्या अपेक्षेचा भंग,
मात्र तरीसुद्धा हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील.
अब्दुल सत्तार यांच्या विरोधात भाजप आक्रमक
उद्या भाजपने दिली सिल्लोड बंदची हाक
शिंदे गट भाजपच्या संघर्षाला सिल्लोडमधून सुरुवात
नगरपरिषदेच्या करवाढी विरोधात भाजपकडून सिल्लोड बंद
उद्या सकाळपासून सिल्लोड बंद
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस
‘झारखंड वित्त विधेयक-2022’ दोन दिवसांपुर्वीच राज्य सरकारकडे परत पाठवले.
तिसऱ्यांदा त्यांनी हे विधेयक परत पाठवले.
नगरसेवक ते राज्यपाल प्रवास…वाचा सविस्तर
भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर
कोश्यारी यांनी राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांनी पत्र लिहिले होते
रमेश बैंस नवे राज्यापाल
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर
वारंवार केल्या जाणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यांनंतर कोश्यारी यांना मोठा विरोध झाला होता
आज अखेर त्यांचा राजीनामा मंजूर झाला आहे
रमेश बैस हे राज्याचे नवे राज्यपाल असतील
आज अजित पवारांची पुण्यात जाहीर सभा
महाविकास आघाडी उद्या पुण्यात घेणार प्रचारसभा
नातूबाग ग्राऊंडवर होणार जाहीर सभा
संध्याकाळी 6 वाजता जाहीर प्रचारसभा
नाना पटोले, निलम गोरे, आणि अजित पवार करणार संबोधित
आज कसब्यातील उमेदवार रविंद्र धंगेकरांच्या प्रचारार्थ अजित पवारांची सभा
कोल्हापूर : ठाकरे गटानंतर आता सर्वपक्षीय कृती समितीचाही राज्यपाल भगतसिंग कोषारी यांच्या दौऱ्याला विरोध,
सर्व पक्ष कृती समिती उद्या कुलगुरूंना जाब विचारणार,
राज्यपाल दीक्षांत समारंभाला आल्यास गुरुवारी कोल्हापूर बंद ठेवण्याचा कृती समितीचा निर्णय,
16 फेब्रुवारीला होणाऱ्या शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासाठी राज्यपाल भगतसिंग कोषारी यांना करण्यात आलय निमंत्रित.
महाविकास आघाडी पुण्यात घेणार प्रचार सभा
नातूबाग ग्राऊंडवर होणार जाहीर सभा
संध्याकाळी 6 वाजता जाहीर प्रचारसभा
नाना पटोले, निलम गोरे, आणि अजित पवार करणार संबोधित
कसब्यातील उमेदवार रविंद्र धंगेकरांच्या प्रचारार्थ अजित पवारांची सभा
ठाकरे गटानंतर आता सर्वपक्षीय कृती समितीचाही राज्यपाल कोश्यारींच्या दौऱ्याला विरोध
सर्व पक्ष कृती समिती उद्या कुलगुरूंना जाब विचारणार
राज्यपाल दीक्षांत समारंभाला आल्यास गुरुवारी कोल्हापूर बंद ठेवण्याचा कृती समितीचा निर्णय
16 फेब्रुवारीला होणाऱ्या शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासाठी राज्यपालांना करण्यात आलय निमंत्रित
पोलीस कस्टडीत रविकांत तुपकर यांचं अन्न त्याग आंदोलन सुरू
काल दुपारी 12 वाजल्यापासून सुरू आहे आंदोलन
बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात आंदोलन सुरूच
काल दुपारी तुपकर यांनी केला होता आत्मदहनाचा प्रयत्न
वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांना पत्र लिहून कलाटे यांनी पाठिंबा देण्याची केली मागणी
2019च्या विधानसभेला वंचितने कलाटे यांना दिला होता पाठिंबा
वंचितचा आधीच महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फोननंतरही राहुल कलाटे यांची उमेदवारी कायम
घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या पथकाच्या मदतीने आग आटोक्यात आणली
काल सायंकाली 7:44 वाजता लागली आगे
आगीत कोणतीही जीवित वा वित्तहानी नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या त्रिपुरात आज दोन सभा
मोदी मतदारांना काय आवाहन करणार याकडे सर्वांचं लक्ष
त्रिपुरा विधानसभेच्या निवडणुका होत आहेत, त्यापार्श्वभूमीवर त्रिपुरात निवडणुकीचं रण माजलं आहे
पोहरादेवी दौऱ्याच्या पूर्व संध्येलाच गावातील रस्त्यांची डागडुजी
पोहरादेवीं मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची झाली होती चाळण
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या दौऱ्यामूळे डागडुजी