मुंबई : महाराष्ट्र, दिल्लीसह देशाच्या अनेक भागात थंडीची लाट. निवडणुकीपूर्वीच पुणे भाजपमधील धूसफूस चव्हाट्यावर. अभिनेता शाहरुख खान भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत. यासह महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये घडामोडी घडत आहेत. या सगळ्या घडामोडींचा या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.
मुंबई
पंकजा मुंडे ब्रिच कँडी रुग्णालयात
धनंजय मुंडे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी पंकजा मुंडे ब्रिच कँडी रुग्णालयात
पुणे
प्रतिनिधी सभा घेण्याची परवानगी केंद्रीय निवडणूक आयोगानं द्यावी शिवसेनेची मागणी
केंद्रीय निवडणूक आयोगानं परवानगी दिली नाही तर शिवसेनेची सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी
निवडणूक आयोगानं मागणी अमान्य केल्यास शिवसेना सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार
सत्तासंघर्षाप्रमाणे शिवसेना प्रतिनिधी सभेसाठीही कोर्टातचं जाणार ?
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावरून आम्ही भूमिका घेऊ
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्याची टीव्ही 9 मराठीला माहिती
– १८,१९,२० जानेवारी रोजी भारत जोडो यात्रेत होणार सहभागी
– राहूल गांधी यांच्या भारत जोडे यात्रेत शिवसेनेचे इतर नेतेही होणार सहभागी…
– राहूल गांधी यांची भारत जोडो यात्रा अंतीम टप्प्यात…
नवी दिल्ली : लक्षद्विप लोकसभा मतदारसंघातील खासदार मोहम्मद फैजल यांना शिक्षा,
खून करण्याच्या प्रयत्नासाठी मदत केल्याचा आरोप,
लक्षद्वीपमधील कवरत्ती जिल्हा सत्र न्यायालयाने १० वर्षांची शिक्षा सुनावली,
2009 च्या प्रकरणात खासदार फैजल यांच्यासह तीन जणांना शिक्षा सुनावली,
चारही आरोपींना कोर्टाने एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला,
मोहम्मद फैजल हे शरद पवार यांच्या जवळचे सहकारी.
वीज चोरीची तपासणी करण्यासाठी गेलं होतं महावितरणचं पथक
तपासणी करत असताना काकडवाल गावातील एका कुटुंबांने चढवला हल्ला
मारहाणीत कार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता, यांच्यासह पाच ते सहा महिला आणि पुरुष कर्मचारी जखमी
महावितरण कर्मचारी तक्रार दाखल करण्यासाठी हिललाईन पोलीस ठाण्यात जमले
पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबेच्या भाजपच्या प्रवेशाची सुरू आहे चर्चा,
आज अचानक साईबाबांच्या समाधीचे घेतले सत्यजित तांबेनी दर्शन,
नेमकं साईना काय साकड घातलं याबाबत चर्चा,
माध्यमांशी बोलण्यास सत्यजित तांबे यांचा नकार.
जळगाव
गुलाबराव ऑन सत्ता संघर्ष सुनावणी
सत्ता संघर्ष ही कोर्टाची लढाई आहे आणि असं म्हणतात की कोणत्याही पुढाऱ्यांनी कोर्टाच्या बाबतीत जास्त बोलू नये
कोर्टाच्या पुढे फायदा तोटा काय सांगता येतं, ते कोर्ट आहे शेवटी
गुलाबराव ऑन उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या बाबतीत मी काहीच बोलणार नाही,
आमची बाळासाहेबांची शिवसेना आहे, आमच्या चार नेत्यांची निवड झाली आहे
पुढच्या काळात पक्ष वाढवण्यासाठी आम्ही राज्यभर फिरणार आहोत
गुलाबराव पाटील ऑन ईडी कारवाई
ती एक प्रक्रिया आहे, जे काही प्रोब्लेम असतील ते निश्चितपणे लक्षात येतील
अशी कारवाई कुणावर झाली की विरोधकांचं एकच उत्तर असते यंत्रणांचा गैरवापर
ईडी ही एक वेगळी एजन्सी आहे, त्यांना वेगळे अधिकार आहेत, सर्वोच्च न्यायालयाने देखील त्यावर शिक्कामोर्तब केलं आहे
मुश्रीफ यांनी काही केलं नसेल तर ते बिनधास्त बाहेर येतील, आता ज्यांनी काही केलं नाही ते बाहेर आलेच ना
नवी दिल्ली
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्याबाहेरचे एकमेव खासदार अडचणीत
लक्षद्विप लोकसभा मतदारसंघातील खासदार मोहम्मद फैजल यांना शिक्षा
खून करण्याच्या प्रयत्नासाठी मदत केल्याचा आरोप
लक्षद्वीपमधील कवरत्ती जिल्हा सत्र न्यायालयाने १० वर्षांची शिक्षा सुनावली
2009 च्या प्रकरणात खासदार फैजल यांच्यासह तीन जणांना शिक्षा सुनावली
चारही आरोपींना कोर्टाने एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला
मोहम्मद फैजल हे शरद पवार यांच्या जवळचे सहकारी
धीरज लिंगाडे बुलढाणा यांना कॉग्रेस कडून उमेदवारी जाहीर होणार असल्याची सूत्रांची माहिती,
मिलिंद चिमोटे धीरज लिंगाडे मध्ये उमेदवारी वरून रस्सीखेच,
कॉग्रेस च्या गोटात नवीन चेहरा द्या म्हणून धीरज लिंगाडे च्या नावावर एकमत झाल्याची माहिती.
कौटुंबिक वादातून तिघांनी धारदार शस्त्राने तरुणाचे लिंग कापले
तरुण गंभीर अवस्थेत मुंबई येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल
मानपाडा पोलीसानी सोनू राम, करण राम, सुरेंद्र राम तीन जणविरोधात गुन्हा दाखल करत दोघांना घेतले ताब्यात
निवडणूक आयोगाची लढाई सुरू असतानाच उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाची मुदत संपत आलीये
अवघे बारा दिवस उरले असताना, आयोगात पक्षाचा संघटनात्मक पेच फसला असताना शिवसेनेत चिंतातुर हालचाली
23 जानेवारी 2023 ला उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाची पाच वर्षे पूर्ण होणार
पुन्हा कार्यकारिणीची बैठक घेऊन संघटनात्मक निवडणुकांसाठी शिवसेनेची आयोगाला विनंती
2018 मध्ये कार्यकारणीच्या बैठकीत पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची दुसऱ्यांदा निवड झाली होती
कालच्या सुनावणी दरम्यान या मुद्यावर निवडणूक आयोगाचा कुठलाच प्रतिसाद नव्हता
आता पुढच्या सुनावणीत तरी दिलासा मिळणार का याकडे शिवसैनिकांचे लक्ष
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर
33 व्या राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन
यावेळी राज्य पोलीस विभागातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार
शिंदे गटाने केली मुख्यमंत्र्यांच्या स्वागताची जय्यत तयारी
आमदार बच्चू कडू यांचा रस्ता क्रॉस करताना अपघात
अमरावतीच्या एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल
डोक्याला आणि उजव्या पायाला मोठ्या प्रमाणात इजा झाल्याची माहिती
बच्चू कडू यांच्या डोक्याला चार टाके पडले असल्याची माहिती
शहरात सकाळी 6 ते साडेसहा च्या दरम्यान रस्ता ओलांडताना एका दुचाकीस्वाराने दिली धडक
धडकेत बच्चू कडू रोडच्या डिव्हायडरवर आदळल्याने डोक्याला मोठ्या प्रमाणात मार लागल्याची माहिती
ठाणे मुंबई ला जोडणारा महत्वाचा मानला जाणारा कोपरी पुलाचे काम अंतिम टप्प्याकडे,
काँक्रिटीकरण पूर्ण होत असून येत्या काही महिन्यात सुरु होणार कोपरी पूल,
मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे या संकल्पनेतून ठाणे शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या दुरुस्थी करणाची कामे जलत गतीने.
हत्याकांडाच्या सहा वर्षानंतर हाती लागला शुटर
चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
कुख्यात सफेलकरही सीबीआयच्या रडारवर असल्याची माहिती
शुटर मोहनीश अंसारी बद्रुद्दीन अंसारीला सीबीआयने केली अटक
15 दिवसात पुरावे सादर करा, अन्यथा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार
मनसेचे ठाणे जिल्हा संघटक हर्षद पाटील यांचा विद्या चव्हाण यांना इशारा
अनेक गुन्हे दाखल असलेल्या संदीप माळीला आमदार रवींद्र चव्हाण आणि मनसेचे आमदार राजू पाटील पाठीशी घालत असल्याचा विद्या चव्हाण यांनी केला होता दावा
12 फेब्रुवारीला करणार पोहरादेवी दौरा
पोहरादेवी विकासकामासाठी 593 कोटी मंजूर करण्यात आले आहेत, त्या कामांचे होणार भूमिपुजन
संजय राठोड यांच्या पुढाकाराने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थिती संजय राठोड करणार शक्तीप्रदर्शन
राजभवनाने 6 जानेवारीला गोंडवाना विद्यापीठाचे प्रकुलगुरू प्रशांत बोकारे यांना राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्यांची 9 नावं पाठवण्यात आली
मात्र ही सर्व नावं भाजपच्या जवळील असल्याचा शिंदे गटाने घेतला आक्षेप
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष नितीन मत्ते यांनी हस्तक्षेप करण्याची केली मागणी
शिंदे गटाने सुचवलेल्या नावांना यादीत स्थान मिळणार नसेल तर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात पक्षविस्ताराला अडचणी येतील याची मुख्यमंत्र्यांना करून दिली जाणीव
कारागृहातील कैद्यांना वैद्यकिय सुविधा म्हणजेच ‘व्हिल चेअर’ आणि स्ट्रेचर ट्रॉली खरेदीसाठी हा निधी मंजूर
व्हिल चेअरसाठी शासनाने 4 लाख 95 हजार 98 इतका निधी दिला
तर स्ट्रेचर ट्रॉली खरेदीसाठी शासनाने 17 लाख 1 हजार रुपयांचा असा एकूण 21 लाख 96 हजार 9 रुपयांचा निधी मंजूर