अकोला : गुढीची उभारण्याची माझी पद्धती वेगळी आहे. संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज यांना मी अभिवादन करतो. शेतकऱ्याचं अन्न नैवद्य म्हणून ठेवतो. गुढीला अभिवादन करतो. गुढी हा परंपरेनुसार साजरा होणार सण आहे. वारकरी संप्रदायामध्ये तुकाराम महाराज यांनी टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट चालावी पंढरीची असा अभंग लिहिला. राम अयोध्येत आले तेव्हा त्यांनी भगवी पताका दाखवली होती. वारकरीही गुढी घेऊन जातो. त्यामुळे पताका फडकवणे हीच खरी गुढी आहे. माझ्या मनाला जे पटतं ते मी करतो. नालायक लोकं मला शिव्या देणार. हे मला माहीत आहे. ताराराणीनंतर मनुवादी विचारसणीचं राज्य प्रस्तापित झालं. त्यावेळी गुढीची परंपरा बदलल्या गेली. सध्या वेगळी विचारधारा कार्य करत आहे, असा आरोपही आमदार अमोल मिटकर यांनी केला.
बागेश्वर बाबाला लोकं देव मानतात. नवनीत राणा यांचं भाषण बघा. त्यांनी सांगितलं की, वो संत हैं. बागेश्वर बाबा यांनी संत तुकाराम यांचा अपमान केला. तरीही खासदार नवनीत राणा या बागेश्वर बाबा यांना संत म्हणतात. याहून महाराष्ट्राचं दुर्दैव काय असं अमोल मिटकरी म्हणाले. मी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता आहे. कुत्सित परंपरा पाळत नाही. गुढी पाडव्याला गुढी न उभारता. संभाजी महाराज यांना अभिवादन करतो, असं मिटकरी यांनी सांगितलं.
केंद्रीय मंत्री किंवा महाराष्ट्रातील भाजप नेते दोन हजारांच्या नोटा कुठं गायब झाल्या. यावरुन विरोधकांनी तो सारा पैसा सरकारच्या निकटवर्तीय उद्योजकांकडे गेल्याचा आरोप केला होता. यावरून काल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी उत्तर दिलं की दोन हजारांच्या नोटा एटीएममध्ये न देण्याचे आदेश केंद्रानं दिलेले नाहीत. हा पूर्णपणे बँकांचा निर्णय आहे. यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी म्हणतात की, 2 हजारच्या नोटा गायब झाल्या नाहीत.
येणाऱ्या 2024 च्या निवडणुकीसाठी भाजपने राखून ठेवल्यात. कदाचित 2 हजारांच्या नोटांची जबाबदारी किरीट सोमय्या यांच्याकडे असू शकते. नेमक्या ह्या नोटा गेल्या कुठे की भाजपने आपल्या सहकाऱ्यांकडे दिल्यात की मोहित कंबोज यांच्या घरी ठेवल्या आहेत. किरीट सोमय्या यांच्या घरी आहेत की टिल्लूच्या घरी आहेत याचा तपास शासकीय यंत्रणेने करावा.
केंद्रीय मंत्र्यांनी दिलेलं स्पष्टीकरण हे हास्यासपद आहे. 2 हजार रुपयांच्या नोटा कुठेही गायब झाल्या नाहीत. त्या भारतीय जनता पार्टीच्या सग्यासोयऱ्यांकडे गहाण ठेवल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे.