अमरावती: त्रिपुरातील एका रॅलीत पैगंबराबद्दल अपशब्द वापरण्यात आल्याने महाराष्ट्रात या घटनेचे पडसाद उमटले आहेत. त्यामुळे अमरावती, मालेगाव, भिवंडीत आणि नांदेडमध्ये प्रचंड मोर्चे काढण्यात आले. अमरावतीत या घटनेचे हिंसक पडसाद उमटल्याने अमरावतीतील परिस्थिती तणावपूर्ण आहे.
त्रिपुरातील एका रॅलीत पैगंबरांबद्दल अपशब्द वापरण्यात आल्याची वार्ता वाऱ्या सारखी पसरल्यानंतर मुस्लिम समाजात प्रचंड असंतोष निर्माण झाला. अमरावतीत मुस्लिम कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून या घटनेचा जोरदार निषेध नोंदवला. बघता बघता हजारो मुस्लिम बांधव एकत्र गोळा झाले आणि त्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जात असताना वाटतेतील दुकाने जबरदस्थीने बंद करण्यात आली. दुकाने बंद करण्यास नकार दिल्याने दुकानांची तोडफोड करण्यात आली. त्यामुळे एकच गोंधळ उडाली आणि वातावरण तणावपूर्ण बनले.
मुस्लिम बांधवांचा मोर्चा येत असून या मोर्चाला हिंसक वळण लागल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जमावावर नियंत्रण मिळवलं. काही प्रमाणात आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाचीही झाली. मात्र, ज्येष्ठ मुस्लिम कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करत आंदोलनावर नियंत्रण मिळवलं. त्यानंतर हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यलायवर धडकला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आलं.
या घटनेच्या निषेधार्थ नांदेडमध्येही बंद पुकारण्यात आला. काही कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून दुकाने बंद करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दुकानदार आणि मुस्लिम तरुणांमध्ये बाचाबाची झाल्याचं वृत्त आहे. नांदेडमध्ये काही ठिकाणी तोडफोड आणि दगडफेक झाल्याचं वृत्त आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांना या घटनेचा निषेध नोंदवणारं निवेदन देण्यासाठी मुस्लिम समाजाचा जमाव निघालेला असताना दगडफेक झाली. त्यामुळे पोलिसांनी जमावावर लाठीमार केल्याने वातावरण तणावपूर्ण झालं होतं.
भिवंडीतही या घटनेच्या निषेधार्थ कडकडीत बंद पुकारण्यात आला. बंदमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था ठप्प होती. तसेच बाजारपेठा आणि दुकानेही बंद होती. भिवंडीतील या बंदमध्ये समाजवादी पार्टी, एमआयएम, काँग्रेस आणि राष्ट्रवादीही उतरल्याने बंद शंभर टक्के यशस्वी झाला. मालेगावमध्येही या घटनेचे पडसाद उमटले. मालेगावातही मुस्लिम समुदायाने बंद पुकारला. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यता आला होता.
दरम्यान, त्रिपुरातील घटनेचे राज्यभरात पडसाद उमटल्याने त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्रिपुरातील कथित घटनांचे भांडवल करून आज अमरावती, नांदेड आणि मालेगाव येथे मोठ्या संख्येने निघालेले मोर्चे आणि त्यातून घडलेले दगडफेक, तोडफोड, हिंसेचे प्रकार अतिशय चिंताजनक आहेत. राज्य सरकारने त्वरित याची दखल घेऊन परिस्थिती नियंत्रणात राहील, याची खबरदारी घ्यावी, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
त्रिपुरातील कथित घटनांचे भांडवल करून आज अमरावती, नांदेड आणि मालेगाव येथे मोठ्या संख्येने निघालेले मोर्चे आणि त्यातून घडलेले दगडफेक, तोडफोड, हिंसेचे प्रकार अतिशय चिंताजनक आहेत.
राज्य सरकारने त्वरित याची दखल घेऊन परिस्थिती नियंत्रणात राहील, याची खबरदारी घ्यावी!— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 12, 2021
मालेगावमध्ये पोलीस परवानगी नसतानाही मोर्चा निघतो. दगड फेकले जातात. महाराष्ट्रात ताकद दाखवली जातेय. हिंदूंना घाबरवल जातंय आणि महाराष्ट्र सरकार गप्प आहे. हे मोर्चे महाराष्ट्र सरकारनी थांबवले नाहीत तर हिंदूंचे पण मोर्चे निघतील. हे राज्य सरकारने लक्षात ठेवावे, असा इशारा भाजप आमदार नितेश राणे यांनी दिला आहे. राणे यांनी ट्विट करून हा इशारा दिला आहे.
हे मोर्चे महाराष्ट्र सरकारनी थांबवले नाहीत..
तर हिंदूंचे पण मोर्चे निघतील..
हे राज्य सरकार नी लक्षात ठेवावे !!!— nitesh rane (@NiteshNRane) November 12, 2021
संबंधित बातम्या:
‘रंग दे बसंती’ ची कथा चोरल्याच्या आरोपातून दिग्दर्शक राकेश मेहरा दोषमुक्त, औरंगाबाद कोर्टाचा निकाल