शेकापाच्या लोहा – कंधार मतदारसंघाचे आमदार शामसुंदर शिंदे याच्या पत्नी व भाजपाचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या भगिनी अशा शिंदे यांचा आज वाढदिवस आहे. आशा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त लोहा कंधार मतदार संघात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वाढदिवसाच्या माध्यमातून आशा शिंदे आज शक्ती प्रदर्शन करणार आहेत तर लोकसभेला पराभव झाल्यानंतर माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी लोहा कंधार विधानसभा मतदारसंघातून मोर्चे बांधणी सुरू केली आहे. भविष्यात बहिणी विरुद्ध भाऊ असा सामना या मतदारसंघात रंगण्याची शक्यता आहे.
भावावर सडकून टीका
कार्यकर्त्यांची इच्छा आहे मी निवडणुकीला उभ राहावं. मी विधानसभेची निवडणूक लढवणार आहे. आम्ही समाजसेवा करतो, आम्ही दुकान लावले नाहीत, दुकान त्यांनी लावल आहे. अशा शब्दात आशा शिंदे यांनी भाऊ प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यावर सडकून टीका केली. तर आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी चिखलीकर यांचा बेईमान म्हणून उल्लेख केला आहे. भविष्यात लोहा कंदर मतदारसंघांमध्ये बहीण विरुद्ध भाऊ असा सामना रंगण्याचे चित्र आहे.
वाढदिवसानिमित्त शक्ती प्रदर्शन
आशा शिंदे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रम ठेवण्यात आले आहे. कार्यकर्त्यांच्या इच्छेखातर रॅली काढण्यात येणार आहे. पण हे शक्ती प्रदर्शन नसल्याचे शिंदे म्हणाल्या. सगळ्यांची इच्छा असल्याने आपण निवडणुकीला उभे राहणार असल्याचे त्या म्हणाल्या. या मतदारसंघात आम्ही खूप काम केले आहे, त्यामुळे एकही तक्रार येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
आता करेक्ट कार्यक्रम करणार
आम्ही कोणाचे पैसे लुबाडत नाहीत, याला अटक करा त्याला अटक करा निगेटिव काम करत नाही. ज्यांना आम्ही खूप मोठे केलं, त्यांचा करेक्ट कार्यक्रम केला जाईल. करेक्ट म्हणजे करेक्ट कार्यक्रम केला जाईल, असा इशारा आमदार श्यामसुंदर शिंदे त्यांनी प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे नाव न घेता दिला. त्यांनी यावेळी चिखलीकरांना शाल-जोडीतून हाणले. त्यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली.
कार्यक्रम असला की ते आमच्या घरी आलेच, पण त्यांच्या घरी कार्यक्रम झाला नसल्याने आम्ही गेलो नाही. कार्यक्रमाला नातं म्हणून जावं लागतं, जसं माझ्या मुलाचं लग्न होतं मामा म्हणून त्यांना यावच लागलं. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी आहे. राजकारण करत असताना दोघांचे ही भिन्न पक्ष आहेत. मी शंभर टक्के शेतकरी कामगार पक्षाकडून इच्छुक आहे. शेतकरी कामगार पक्ष महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे, असे आशा शिंदे म्हणाल्या.