रत्नागिरी: केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला ललकारले आहे. शिवसेनेला ललकारतानाच त्यांनी पोलिसांनाही कानपिचक्या दिल्या आहेत. आम्ही विरोधी पक्षात बसायला जन्माला आलेलो नाही. आम्हीही सत्तेत येऊ, असं सांगतानाच पोलिसांनी कायद्याने कारवाई करावी. अन्यथा पुढे काय होईल त्याला सामोरे जावं, असा इशारा नारायण राणे यांनी दिला. (narayan rane attacks cm uddhav thackeray over chaos between shiv sena and bjp)
नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन हा इशारा दिला. आम्हीही भविष्यात महराष्ट्रात सत्तेत येऊ. केंद्रात सत्तेत आहोत. वरिष्ठांकडून काहीही आदेश आले तरी अधिकाऱ्यांनी कायद्याच्या चौकटीत कारवाई केली पाहिजे. नाही तर तुम्हाला त्याचा सामना करावा लागेल, असं राणे म्हणाले.
सभेची बंधनं फक्त नारायण राणेंनाच आहे का? आम्हाला मनाई का? कोरोनाची लाट होती तेव्हा कारवाई झाली नाही? आता संपल्यावर कारवाई होतेय. त्यांना विरोध करू दे ही सत्तेची मस्ती आहे. कायदा सुव्यवस्था राहिली नाही. घरात घुसून बलात्कार होत आहेत. दरोडे पडत आहेत. खून मारामारी विचारू नका. सुशांतची हत्या झाली. दिशा सालियानची बलात्कार करून हत्या झाली. आरोपी नाही मिळाले. असे अनेक प्रकरणं आहेत. त्याचे खरे आरोपी नाही मिळाले. ते मिळणारही नाही, असं ते म्हणाले.
राणेंच्या पाठी लागू नका. नाही तर मी आता थोडंच बोलतोय. नाही तर सर्वच बोलावं लागेल. ते परवडणार नाही. केसेस काढू हे काढू. अरे मी एवढाच क्रिमिनिल होतो तर मुख्यमंत्री कसं केलं? मंत्री, आमदार, नगरसेवक शाखाप्रमुख कसं केलं? पहिली पदं तुम्हीच दिली ना तेव्हा विरोध का केला नाही? 39 वर्षात शिवसेनेसाठी जे काही केलं… साहेबांना जेव्हा अतिरेक्याकंडून धोका होता, साहेबांना जेव्हा मातोश्री सोडायला सांगितलं. तेव्हा साहेबांनी सुपुत्राला सोबत घेतलं नाही, असं ते म्हणाले.
माझ्या घरासमोर आलेले चिव सैनिक. माझ्या घरासमोर आला म्हणून त्याचा सत्कार केला. चोपचोप चोपलं पोलिसांनी. असो थोडं थोडं काढू. एकाचवेळी अनेक ब्रेकिंग न्यूज नको, असं त्यांनी सांगितलं. (narayan rane attacks cm uddhav thackeray over chaos between shiv sena and bjp)
VIDEO : 100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 27 August 2021https://t.co/UO1rQexmHK#SuperFastNews100 #SuperFastNews #MarathiNews
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 27, 2021
संबंधित बातम्या:
बाहेर शिवसेना-राणेंमध्ये राडा, फडणवीस-मुख्यमंत्र्याची बंद दाराआड चर्चा; तर्कवितर्कांना उधाण
राजकारणात वातावरण बदल होतोय, काही विषाणुही येतायेत, आमच्यासाठी विषय संपला: आदित्य ठाकरे
उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या असहिष्णुतेचे जनक, आशिष शेलार यांचा घणाघाती हल्ला
(narayan rane attacks cm uddhav thackeray over chaos between shiv sena and bjp)