सिंधुदुर्ग: भाजप नेते नारायण राणे आणि शिवसेनेत राडा सुरू असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. त्यामुळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यावर नारायण राणे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बंद दाराआड चर्चा ही तुमची भाषा आहे. उगाच लावालावी करू नका, मला अशा भेटीने काही फर्क पडत नाही, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. (narayan rane first reaction on devendra fadnavis and cm uddhav thackeray meeting)
नारायण राणे यांनी आज सकाळी जन आशीर्वाद यात्रा सुरू केल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांना फडणवीस-ठाकरे भेटीवर विचारण्यात आलं. त्यावेळी त्यांनी राणेंनी आपल्या स्टाईलने उत्तर दिलं. बंद दाराआड चर्चा ही तुमची भाषा आहे. त्यामुळे तुम्ही लावालावी करू नका. कुणी कुणाला भेटल्याने मला काहीच फरक पडत नाही. उलट मी अजूनच सुरू झालोय. मी थांबणार नाही. मवाळ होणे माझ्या स्वभावात आणि राशीत नाही, असं राणे म्हणाले.
राणेंचं अटक नाट्य झाल्यानंतर सह्याद्री अतिथीगृहावर ओबीसी आरक्षणाबाबतची बैठक पार पडली. यावेळी आधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यात बंद दाराआड 10 मिनिटे चर्चा झाली होती. त्यानंतर ठाकरे-फडणवीस यांच्यात 15 मिनिटे चर्चा झाली. त्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आलं होतं.
बाळासाहेबांना धोका होता तेव्हा साहेबांनी मला माझ्या लोकांना घेवून बोलावले होते. साहेब अज्ञातस्थळी असताना मी त्यांच्याबरोबर होतो. त्यांनी मुलाला सोबत घेतलं नव्हतं, असंही ते म्हणाले.
महाराष्ट्राचे कुठलेही काम असेल तर मी ते करेल. उद्या एखादा शिवसैनिक जरी माझ्याकडे एखादी स्किम घेऊन आला तरी मी काम करेन. कारण शेवटी तो देशाचा नागरिक आहे, असं त्यांनी सांगितलं.
यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यावरही टीका केली. अजित पवारांनी नको त्या गोष्टीत लक्ष देऊ नये. त्यांनी त्यांचं खातं पाहावं. मी अजून राष्ट्रवादीकडे वळलोच नाही, असा इशाराही त्यांनी दिला. (narayan rane first reaction on devendra fadnavis and cm uddhav thackeray meeting)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 29 August 2021 https://t.co/p1tCobauIS #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 29, 2021
संबंधित बातम्या:
राज्यात कायद्याचं राज्य आहे तर अनिल परब यांना स्वत:हून अटक करा; चंद्रकांतदादांचा पलटवार
VIDEO: शिवसेना-भाजपमध्ये कोण दुरावा निर्माण करतंय?; संजय राऊतांकडून पहिल्यांदाच नाव जाहीर
(narayan rane first reaction on devendra fadnavis and cm uddhav thackeray meeting)