भंडारा: विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलेले बँकेतील घोटाळे मी बाहेर काढण्यास सुरुवात केल्याने त्यांनी माझ्याविरोधात एक हजार कोटींचा दावा दाखल केला आहे. पण मी या गोष्टींना घाबरत नाही, जो डर गया, वो मर गया, असं सांगतानाच प्रवीण दरेकरांनी सुरू केलेल्या आखाड्यात दोन हात करायला मी तयार आहे, असं आव्हानच राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिलं आहे.
नवाब मलिक भंडाऱ्यात आले आहेत. मीडियााशी संवाद साधताना त्यांनी थेट दरेकरांना आव्हानच दिलं. दरेकरांचे घोटाळे काढण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांनी माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे. पण मी घाबरत नाही. जो डर गया, वो मर गया, असा खोचक टोला मलिक यांनी लगावला. तसेच प्रवीण दरेकरांनी सुरु केलेल्या आखाड्यात मी दोन दोन हात करायला तयार असल्याचेही त्यांनी सांगितले. मी कोणाला घाबरत नाही. जिथे अन्याय तिथे मी बोलेनच, असंही त्यांनी सांगितलं.
दरेकर हे मजूर सोसायटीचे सदस्य झाले. ते सदस्या होण्यास पात्रही नाहीत. मी देखील या बँकेत खातेदार असल्याने मी घोटाळे उघड करेन या भीतीने दरेकर माझ्यावर हजार कोटींचा अब्रू नुकसानीचा दावे करत आहेत, असा दावाही त्यांनी केला. विरोधक अनिल देशमुखांप्रमाणे माझ्यावर देखील षडयंत्र रचत असून माझी हत्या केली तरी मी घाबरणार नाही, असंही ते म्हणाले.
यावेळी त्यांनी यूपीएबाबतही प्रतिक्रिया व्यक्त केली. शरद पवार हे सामुदायिक नेतृत्वावर विश्वास ठेवतात. त्यामुळे काँग्रेसला वगळून यूपीए होऊच शकत नाही. शरद पवार हे सर्वांना घेऊन जात आहेत, असंही त्यांनी सांगितलं. शरद पवार हे गेल्या वर्षभरापासून काँग्रेससह विरोधकांची मोट बांधत आहेत. 150 खासदारांना एकत्र करून यूपीएसोबत नॉन यूपीएला सोबत घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, नवाब मलिक यांना समीर वानखेडे प्रकरणी 13 डिसेंबर रोजी जिल्हा न्यायालयात हजर राहावं लागणार आहे. एनसीबीचे प्रमुख समीर वानखडे यांनी जातीचे खोटे प्रमाणपत्र दाखवून नोकरी मिळविली आहे. त्यामुळे त्यांची नोकरी जाणार असल्याचं विधान वानखेडे यांनी केलं होतं. मात्र त्यांच्या नातेवाईकासह वानखेडेंजवळ अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र असल्याने त्याचे चुलतभाऊ संजय वानखडे यांनी वाशिम शहर पोलिसांत ॲट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार आज वाशिम जिल्हा सत्र न्यायालयाने मलिक यांना 13 डिसेंबर रोजी वाशिम कोर्टात आपलं म्हणणं मांडण्यासाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
यावेळी संजय वानखडे यांचे वतीने ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. उदय देशमुख यांनी न्यायालयामध्ये जोरदार युक्तीवाद केला. तेव्हा जिल्हा व सत्र न्यायाधीश मेनजोगे यांनी मलिक यांना आपली बाजू मांडण्यासाठी 13 डिसेंबर रोजी वाशीम न्यायालयात हजर राहावे असा आदेश दिला आहे. या प्रकरणात मलिक त्यांची बाजू मांडण्यासाठी वाशिम न्यायालयात येणार असल्यामुळे वाशिम जिल्ह्यातील जनतेचे या प्रकरणाकडे लक्ष लागले आहे.
VIDEO : वरळी बीडीडी चाळीतील सिलेंडर स्फोटात वडिलांचाही मृत्यू, ही घटना अतिशय वेदनादायी आहे : आशिष शेलार#Mumbai | #BJP| #Ashishshelar pic.twitter.com/PEPlq1wcTv
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 4, 2021
संबंधित बातम्या:
Ramnath Kovind : हेलिपॅडला विरोध, राष्ट्रपती कोविंद रोपवेने रायगडावर येणार! संभाजीराजेंचं ट्विट
Nashik| कंगनाचा राजसत्तेतील काही लोकांकडून उपयोग; कवी आणि अभिनेता किशोर कदमांचे परखड वक्तव्य