नांदेड : नांदेडमध्ये आज खळबळ उडाली. कारणही तसंच होतं. राष्ट्रीय तपास यंत्रणा (National Investigation Agency) नांदेडमध्ये दाखल झाली. त्यामुळं नेमकं काय झालं, याची चर्चा सुरू झाली. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या पथकानं नांदेड शहरात थेट छापेमारी केली. व्हॉट्सअप गृपवर एक मेसेज पाठविण्यात आला होता. तो उर्दूमध्ये (Urdu) होता. अरबी 3 जणांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांची विचारपूस करण्यात आली. आज पहाटेच तिघांनाही ताब्यात घेण्यात आले. सुमारे 12 तास या तिघांचीची चौकशी करण्यात आली. परंतु, या तिघांची सुटका (Release of Three) करण्यात आली.
नांदेड येथील युवकानं व्हॉट्सअप गृपवर चॅटिंग केली होती. त्यात काही अरबी वाक्यांचा अर्थ उर्दूत सांगितला होता. त्याच गृपमध्ये काही संशयित होते. त्यावरून नांदेडच्या युवकांची चौकशी करण्यात आली. परंतु, चौकशीत काही निष्पन्न झालं नसल्याची माहिती आहे. त्यामुळं या तिघांनाही सोडून देण्यात आले.
आज पहाटे राष्ट्रीय तपास यंत्रणेची टीम नांदेडमध्ये दाखल झाली. त्यानंतर त्यांनी व्हॉट्सअपवरील चॅटिंगसंदर्भात चौकशी केली. अरबी भाषेतील काही वाक्यांचा अर्थ यात स्पष्ट करून सांगितला होता. त्याचा नेमका काय अर्थ होतो. तो व्हॉट्सअपवर का शेअर केला. याचे दूरगामी परिणाम काय होतील, याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेने केला.
NIA च्या चमुला नांदेडमधील तिघांवर संशय आला. या तिघांनी कोणत्या कारणाने मेसेज पाठविला याचा संशय आला. त्यामुळं त्यांनी चौकशी केली. या चौकशीत त्यांना काही सापडलं नसावं. त्यामुळं तिघांचीही सुटका केली. तब्बल 12 तास ही चौकशी चालली.