सिंधुदुर्ग: भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी संतोष परब हल्ला (Santosh Parab) प्रकरणी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात (Sindhudurg Session Court) अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केलाय. नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालय ओरोस येथे ही सुनावणी होणार आहे. या सुनावणी दोन्ही बाजूंच्यावतीनं वकिलांची फौज उभी करण्यात येणार आहे. त्यामुळं सिंधुदुर्ग आणि कोकणच्या राजकारणासाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीदरम्यान संतोष परब यांच्यावर झाला होता. यानंतर संतोष परब यांनी कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केलेला आहे. संतोष परब यांच्याबाजून शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी आक्रमक भूमिका घेतलीय. संतोष परब यांच्यावरील हल्ल्यानंतर सध्या राजकीय वादंग पाहायला मिळतोय. राणे विरुद्ध सेना असा संघर्ष यामुळे निर्माण झालाय.
भाजप आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन प्रकरणात उद्या सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात दोन्ही बाजूने वकिलांची फौज उभी केली जाणार आहे. नितेश राणे यांच्यातर्फे बाजू मांडताना अॅड. संग्राम देसाई हे युक्तिवाद करतील. त्यावेळी त्यांच्याबरोबर अॅड राजेंद्र रावराणे, राजेश परुळेकर, उमेश सावंत, अविनाश परब,प्रणिता कोटकर, प्राजक्ता शिंदे या कायदेतज्ज्ञांची टीम सहकार्याला असेल.
विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. प्रदीप घरत आणि अॅड. भूषण साळवी यांची नियुक्ती करण्यात आली असून ते राज्य सरकारतर्फे युक्तिवाद करतील. विशेष सरकारी वकिलांतर्फे नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामिनाला न्यायालयात भक्कमपणे विरोध करण्याची व्यूहरचना आहे. आज दुपारी 2:45 वाजता जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. संतोष परब यांच्यावरील हल्ला प्रकरणात नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.
भाजपचे आमदार नितेश राणे यांनीच हा हल्ला केल्याचा आरोप पुन्हा एकदा संतोष परब यांनी केलाय. आपण या कटामागे नाही असे सांगणारे नितेश राणे आता अटकपूर्व जामीन का घेतात, असा सवाल देखील संतोष परब यांनी उपस्थित केला आहे. न्यायव्यवस्थेवर आपला विश्वास असून आपल्याला न्याय नक्की मिळेल असा दावाही संतोष परब यांनी केलाय.
इतर बातम्या:
Narayan Rane | अज्ञातवासात जायची आम्हाला गरज नाही, नितेश राणे सिंधुदुर्गातच आहेत – नारायण राणे
Nitesh Rane file anticipatory bail application live updates at Sindhudurg district session court in Santosh Parab attack case hearing today