सिंधुदुर्ग: सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळाचं उद्घाटन उद्या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय नागरी उड्डयण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, केंद्रीय लघूउद्योग मंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे. कोकण रेल्वेनंतर हा आमच्या सिंधुदुर्गासाठी फार मोठा क्षण आहे. राणे साहेबांच्या पुढाकाराने हे विमानतळ सुरू होतेय. राणे साहेब आणि मुख्यमंत्र्यांसह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. कोकणवासीय म्हणून माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे, असं आमदार नितेश राणे म्हणाले आहेत.
पदावर कुणा नावाची व्यक्ती बसली आहे यापेक्षा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून जिल्ह्यात येत आहेत म्हणून स्वागतच करणार. ज्या गोष्टी घडल्या त्या घडल्या त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला नाही. एक 70 वर्ष व्यक्तीला त्यांच्या पोलिसांनी उठवलं आहे. एका केंद्रीय मंत्र्याला कशी वागणूक द्यायला हवी हे राज्याच्या मंत्र्यांना प्रशासनाला कळायला हवं होतं. आमच्या वर चांगले संस्कार आहेत. आमच्या जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांचे योग्य स्वागत होईल असा विश्वास आम्ही देतो, असं नितेश राणे म्हणाले.
विकासाच्या विमानाचे टेक ऑफ होणार आहे. श्रेयवादात मला जायचे नाही. पण लोकांना आठवणीत आहेत. बाकीचे आंदोलन करीत होते, काँट्रॅकसाठी भांडत होते तेव्हा राणे साहेब विमानतळासाठी आणि अनेक विकास प्रकल्पसाठी संघर्ष करीत होते. जे आज श्रेयासाठी स्पर्धा करीत आहेत ते जेव्हा विमानतळ भूमिपूजन झाले तेव्हा आंदोलन करीत होते. आम्हला स्वतःला सिद्ध करण्याची गरज नाही. सिद्ध कुणाला करायला लागते ज्याला सिद्ध करायचे असते. आम्ही जिल्हावासियासाठी काम केले आहे. त्यामुळे ज्याला श्रेय घ्यायचे, नाचून दाखवायचे आहे त्यांनी ते करावे. पण आम्हला समाधान याचे की राणे साहेबांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण होत आहे, असं नितेश राणे म्हणाले.
राणे साहेबांबरोबर राज्यातील भाजप नेते आणि स्थानिक मंडळी असे 25 जण विमानाने प्रवास करणार आहेत. भाजप शिवसेना नेते एकत्र प्रवास हे विकासाच्या दृष्टीने पाहिले तर समाधानकारक आहे. हे विमानतळ सगळ्या जनतेसाठी असणार आहे. त्यामुळे सगळे एकत्र आले तर चांगले आहे. फक्त टर्ब्युलन्स (अशांतता) कमी व्हावा अशी अपेक्षा आहे, असं नितेश राणे म्हणाले.
मी ग्राउंडवर आहे, वरून आलेल्या विमानाच्या स्वागताची जबाबदारी मला दिली आहे. माझी अपेक्षा एवढीच की विमान सुखरूप खाली लँड व्हावे. धाकधूक नाही, त्या विमानात राणे साहेब आहेत. त्यांनी राज्यकर्त्यांना काही प्रश्न विचारावेतविमानतळाला स्वतंत्र नळपाणी योजना का दिली नाही ? स्वतंत्र वीज का दिली नाही ? जोड रस्ता बनायला विलंब का ? ज्या लोकांनी विमानतळाला जमिनी दिल्या त्यांना अल्प मोबदला का ? त्या गावच्या सरपंचना कार्यक्रमाचे आमंत्रण का नाही ? भूमिपत्रांना रोजगार का नाही ? विनायक राऊत यांच्या भाच्याच्या कंपनीला हाऊस किपिंग चे काम का दिले ? विमानतळ भूमिपुत्रांसाठी की तुमच्या कुटुंबियासाठी आहे ? म्हणून मी म्हटले टर्ब्युलन्स होता कामा नये आणि सुखरूप लँडिंग व्हावं, असं नितेश राणे म्हणाले.
आम्ही हा राजकीय कार्यक्रम म्हणून बघत नाही आमच्यासाठी हा विकासाचा कार्यक्रम आहे. पण शेवटी नेते मंडळी आहेत. त्यांच्या डोक्यात काय चालत याची कल्पना नसते त्यामुळे थोडी वाट पाहावी लागेल. मला वाटते कार्यक्रमात सुसंवाद दिसेल. कार्यक्रमाच्या आधी ज्योतिरादित्य यांच्याशी मुख्यमंत्र्यांचा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद झालाय. राणे साहेब केंद्र सरकार आणि मोदी साहेबांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहणार आहे. त्यामुळे मला वाटते कार्यक्रम व्यासपीठावर सुसंवाद दिसेल, असंही नितेश राणे म्हणाले.
इतर बातम्या:
महापालिका निवडणुकीत भाजप सोडून इतर पक्षांनी एकजूट व्हावं, शरद पवारांची हाक
Nitesh Rane said he will welcome Chief Minister Uddhav Thackeray on the inauguration ceremony of Chippi Air Port