नांदेड : लोकांच्या संपर्कापासून दूर जाऊ नका, त्यांच्या संपर्कात रहा, तरच आपल्या पक्षाला भरघोस यश मिळेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी व्यक्त केला. संघटना व्यवस्थित बांधा. त्याकडे दुर्लक्ष करु नका. नवी पिढी पुढे आणली पाहिजे. सक्षम खंबीर व शरद पवारसाहेबांचा विचार पोचवणारा कार्यकर्ता तयार करा, असे आवाहनही जयंत पाटील यांनी यावेळी केले. (Only by staying in touch with the people will our party be successful; Jayant Patil appeal to prty workers)
राष्ट्रवादी परिवार संवाद दौर्याचा आज पाचवा दिवस असून आज प्रदेशाध्यक्षांनी माहूर – किनवट विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. याअगोदर पाटील यांनी पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन केले. दरम्यान, माजी आमदार प्रदीप नाईक यांनी मतदारसंघात अनेक विकासकामांची मागणी केली. या बैठकीत जयंत पाटील यांनी कार्यकर्ते व पदाधिकारी यांना मार्गदर्शन करताना बुथ कमिट्या सक्षम करण्याचे आवाहन केले.
या आढावा बैठकीला मराठवाडा संपर्क प्रमुख व माजी खासदार जयसिंगराव गायकवाड, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, जिल्हाध्यक्ष हरीहरराव भोसीकर, माजी आमदार प्रदीप नाईक, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, अल्पसंख्याक सेल प्रदेशाध्यक्ष मोहम्मद खान पठाण, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, महिला जिल्हाध्यक्षा प्रांजली रावणगावकर, माहूर नगराध्यक्ष शितल जाधव, तालुकाध्यक्ष मेघराज जाधव आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्रातील भाजप सरकारवर गंभीर आरोप केलाय. केंद्र सरकार सहकार क्षेत्र संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे. गोरगरीब, खेड्यातील सामान्य माणूस, शहरातील माणसं आणि मध्यमवर्गीय एकत्र येऊन अतिशय चांगल्या पध्दतीने बॅंका चालवतात. त्या बॅंकांवर निर्बंध आणणं चुकीचं आहे. रिझर्व्ह बॅंकेचं हे धोरण निषेधार्ह आहे. केंद्रातील भाजप सरकार सहकार क्षेत्राला संपवण्याचा प्रयत्न करत, अशा शब्दात पाटील यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवर टीकास्त्र सोडलं आहे.
संबंधित बातम्या
(Only by staying in touch with the people will our party be successful; Jayant Patil appeal to prty workers)