पालघर / मोहम्मद हुसैन (पालघर प्रतिनिधी) : पालघरमध्ये सापडलेल्या अज्ञात मृतदेहाचे गूढ उकलण्यास पोलिसांना यश आले आहे. अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने पत्नीनेच प्रियकरासोबत मिळून पती (Husband)ची हत्या (Murder) केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी हा मृतदेह पालघर जिल्ह्यातील दहिसर हद्दीत डुनगीपाडा परिसरात आणून टाकण्यात आला होता. दिनेश पांचाळ असे मयत इसमाचे नाव आहे. याप्रकरणी मनोर पोलिसांनी पत्नीसह पात जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. (Police succeed in unraveling the mystery of the murder in Palghar)
पालघरमधील मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहिसर येथील डुनगीपाडा परिसरात गेल्या आठवड्यात रस्त्यालागत एक अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करत घटनेचा तपास सुरु केला. हा मृतदेह ठाणे राबोडी येथील दिनेश पांचाळ यांचा असल्याचे उघड झाले. त्यानुसार पोलिसांनी अधिक तपास करीत प्रकरणाचा छडा लावला.
दिनेश यांच्या पत्नीचे दुसऱ्या पुरुषासोबत प्रेमसंबंध होते. याच प्रेमसंबंधातून पत्नीने प्रियकरासोबत मिळून पती दिनेश पांचाळ यांचा काटा काढल्याचे समोर आले. या सर्व प्रकरणात तपास अंतर्गत मनोर पोलिसांनी पत्नीसह पाच जणांच्या मुसक्या आवळल्या असून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी हा मृतदेह पालघर जिल्ह्याच्या हद्दीत दहिसर हद्दीत डुनगीपाडा परिसरात आणून टाकण्यात आला होता.
राज्याची उपराजधानी नागपूरात फेब्रुवारी महिन्यात एकही हत्येची घटना नाही. हा एक रेकॉर्ड ठरला. रक्तविरहीत फ्रेब्रुवारीमुळं नागपूर पोलिसांच्या कामगिरीची प्रशंसाही झाली. मात्र, हे कौतुक फार काळ टिकवता आले नाही. मार्च महिन्यात आतापर्यंत नऊ खुनाच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे या रक्तपाताने नागपूर हादरले आहे.
गेल्या काही वर्षात नागपूर शहराची ओळख क्राइम सिटी अशी झालीय. सातत्याने खुणांच्या, घरफोडी, लुटीच्या घटनांनी नागपूर शहरात गुन्हेगारी वाढली. मात्र, दरम्यानच्या काळात नागपूर शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळायला सुरुवात केली. अनेक गुन्हेगारांवर मकोका, एमपीडीए आणि हद्दपारीची कारवाई केली. मात्र, तरीही हत्येच्या घटना कमी होताना दिसत नाहीत. (Police succeed in unraveling the mystery of the murder in Palghar)
इतर बातम्या
Nagpur Crime : भाड्याने घर बघण्याच्या बहाण्याने चोरी करणाऱ्या वृद्ध महिलेला पोलिसांनी घातल्या बेड्या