अहमदनगर : अहमदनगर जिल्हा रुग्णालायात लागलेल्या भीषण आगीत तब्बल अकरा जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर विरोधक ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधत आहेत. भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी तर अनेक गंभीर आरोप केले आहेत. या रुग्णालयाचे फायर ऑडीट झाले नव्हते. या घटनेचं राजकारण करणार नाही. पण ज्यांनी यामध्ये हलगर्जी केलेली आहे; त्यांच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी विखे पाटील यांनी केलीय.
“या घटनेत निष्पाप लोकांचा बळी गेला. प्रशासनाच्या अक्षम्य अशा हलगर्जीपणाचा हा परिणाम आहे. या रुग्णालयाचे फायर ऑडीट झाले नसल्याची माहीती माहिती मिळत आहे. मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र यापूर्वीही त्यांनी अनेक आदेश दिलेले आहेत. पण ते सर्व भाषणातच होत. या घटनेचं राजकारण करणार नाही, मात्र ज्यांनी हलगर्जीपणा केला त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा,” असे राधाकृष्ण पाटील म्हणाले.
अहमनदगर रुग्णालयातील दुर्घटनेची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना तत्काळ पाच लाख रुपये मदत जाहीर केली आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. तसेच गुदमरल्यामुळे लोकांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.
अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयू विभागाला आग लागल्याची घटना घडली. ही आग एवढी भीषण होती की यामध्ये एकूण 11 जणांचा होरपूळून मृत्यू झाला असून काही रुग्ण जखमी झाले आहेत. आगामी काळात मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आग लागल्यानंतर घटनेची माहिती मिळताच अग्नशमन दल घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर वायुवेगाने आग विझविण्याची मोहीम हाती घेण्यात आली. याच वेळेत बाकीच्या 20 जणांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं. नंतर या घटनेची माहिती होताच जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ नगरकडे रवाना झाले होते.
ही आग शॉटसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. दरम्यान, या दुर्घटनेप्रकरणी सखोल चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आयसीयू वॉर्डातआज आग लागून झालेल्या दुर्घटनेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकसंवेदना व्यक्त केली असून याप्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले.
इतर बातम्या :
तर तुमचं मंत्रिपद जाऊ शकतं; दीपक केसरकर यांचा नारायण राणेंना टोला
VIDEO: सुनील पाटील प्रकरणाची सीबीआय चौकशी करा, आशिष शेलार यांची मागणी
(radhakrishna vikhe patil comment on ahmednagar district hospital fire alleged that hospital did not have fire audit)