रत्नागिरी : महाराष्ट्रातील कोरोना विषाणू रुग्णसंख्या कमी होत असल्याचं चित्र आहे. मात्र, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढत असल्याचं चित्र आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येनं शतक पार केल्यानं जिल्ह्यात चिंता वाढली आहे. सर्वाधिक रुग्णसंख्या रत्नागिरी तालुक्यात वाढल्यानं प्रशासन आणि आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेल्या महिनाभरापासून कोरोना रुग्णसंख्या 100 च्या आत होती. मात्रस महिन्याभरानंतर पुन्हा एकदा रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्येने शंभरचा आकडा पार केलाय. गेल्या चोविस तासात जिल्ह्यात 103 कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे रत्नागिरीकरांच्या उरात धडकी भरलीय.
रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक रुग्ण संख्या आढळून आल्यानं चिंता वाढलीय. रत्नागिरी तालुक्यात 50 पेक्ष अधिक रुग्ण आढळल्याची माहिती आहे. रत्नागिरी जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या निमित्तानं चाकरमानी दाखल झाले होते. जवळपास सहा लाख चाकरमानी जिल्ह्यात आले होते. गणेशोत्सवासाठी चाकरमानी येवून गेल्यानंतर आता कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढतेय. त्यामुळं प्रशासन सतर्क झालंय आहे.
राज्यात कोरोना रुग्णसंख्या कमी होत असली तरी नागरिकांनी कोरोना नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. मास्क आणि फिजिकल डिस्टन्सिंगचं देखील पालन करावं, असं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलं आहे.
देशातील कोरोना रुग्णसंख्या
देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेले काही दिवस नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत घट होताना दिसत होती, मात्र आता पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत जवळपास 3 हजारांनी वाढ झाली. कालच्या दिवसात देशात 26 हजार 727 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 277 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यातल्या त्यात दिलासा मानला जात आहे. देशातील सक्रिया कोरोनाग्रस्त रुग्णसंख्या गेल्या काही दिवसांपासून सातत्याने तीन लाखांच्या खाली आहे.
इतर बातम्या:
Ratnagiri Corona Update corona patient number cross hundred health department on alert