रत्नागिरी : जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील धोपेश्वर रिफायनरी (Dhopeeshwar Refinary) प्रकल्प प्रकरणात आता अणखी एक ट्टिस्ट पहायला मिळतोय. या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या आंदोलकांना पैसे कुठून येतो, यासंदर्भात आता चौकशी केली जाणार आहे. एमआयडीसीनं (MIDC) ग्रीन रिफायनरी संदर्भात चर्चेसाठी लोकप्रतिनिधीना पाचारण केलंय. एमआयडीसीच्या प्रादेक्षिक अधिकाऱ्यांनी हे चर्चेचं आमंत्रण दिलंय. ग्रामपंचायत सरपंचापासून (Sarpanch) ते जिल्हा परिषद सदस्यांना या बैठकीचं निमंत्रण दिलं गेलंय. धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पाच्या अखत्यारित येणाऱ्या आठ सरपंचांनाही या बैठकीचं निमंत्रण देण्यात आलंय. उद्या सोमवारी सायंकाळी 4 वाजता होणार जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक होणार आहे. दरम्यान, रिफायनरी विरोधी समितीचा या बैठकिवर बहिष्काराचा निर्णय घेतलाय. एमआयडीसीच्या चर्चेसाठी बोलावलेल्या बैठकीला सरपंच जाणार नाहीत, असा रिफायनरी विरोधी समितीचा निर्धार आहे. त्यामुळे समर्थक आणि विरोधकांचा संधर्ष पेटणार आहे.
राजापूर तालुक्यातील धोपेश्वर, बारसू, गोवळ परिसरात प्रस्तावित असलेल्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला केंद्र आमि राज्य शासनाने हिरवा कंदिल दिला आहे. मात्र काही स्थानिक संघटनांनी या प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. याविरोधात स्थानिक संघटनांच्या नेतृत्वात आंदोलनेही झाली आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी आता स्थानिक लोकप्रतिनिधींना चर्चेसाठी आमंत्रण देण्यात आलं आहे. एमआयडीसीतील प्रादेशिक अधिकाऱ्यांनी सोमवारी यासंदर्भातील बैठक बोलावली आहे.
रिफायनरी विरोधक तीन दिवसांपूर्वी चांगलेच आक्रमक झाले होते. . धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पाच्या आधी शिवणे खुर्द गावाच्या माळरानावर सुरु असलेला सर्व्हे रिफायनरी विरोधकांनी रोखला. आपल्या हक्काच्या जमिनीत सरकारकडून अनधिकृत सर्व्हे कसा सुरु आहे असा आरोप करत हजारो ग्रामस्थांनी माळरानावर धरणे आंदोलन केलं होतं.
सोमवारी एमआयडीसीतील प्रादेशिक अधिकाऱ्यांनी राजापुरातील लोकप्रतिनिधींना बैठकीसाठी आमंत्रण दिलं आहे. यावेळी ग्रामपंचायत सरपंचापासून ते जिल्हा परिषद सदस्यांना बैठकीचं निमंत्रण देण्यात आलं आहे. धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पाच्या अखत्यारित येणाऱ्या आठ सरपंचांनाही बैठकीसाठी बोलावण्यात आलं आहे. रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक संपन्न होईल. मात्र रिफायनरी विरोधी समितीचा या बैठकीवर बहिष्कार टाकला आहे. एमआयडीसीच्या चर्चेसाठी बोलावलेल्या बैठकीला सरपंच जाणार नाहीत. यामुळे विरोधक विरुद्ध समर्थक असा संघर्ष पेटणार अशी चिन्ह आहेत.