रत्नागिरी: महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेनंतर डेल्टा प्लस वेरिएंटचं (Delta Plus Variant ) संकट उभं राहिलं आहे. राज्यात आतापर्यंत सर्वाधिक रुग्ण रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यात आढळले होते. रत्नागिरीतील पहिल्यांदा आढळलेल्या 9 रुग्णांपैकी 8 रुग्ण बरे झाले आहेत. तर एका महिलेचा मृत्यू झाला होता. रत्नागिरी जिल्हा प्रशासन डेल्टा प्लसचे रुग्ण आढळल्यानं सतर्क झालं आहे. जिल्हा प्रशासनानं आणखी डेल्टा प्लस विषाणूच्या तपासणीसाठी 117 नुमने दिल्लीला प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. (Ratnagiri update Delta Plus Variant 117 samples sent to Delhi lab for test)
रत्नागिरी जिल्ह्यातून दिल्लीच्या प्रयोगशाळेत डेल्टा प्लसच्या तपासणीसाठी 117 नमुने पाठवण्यात आले आहेत. 117 स्बॅब दिल्लीच्या प्रयोग शाळेत पोहोचले आहेत, जिल्हा प्रशासनाला अहवालाची प्रतीक्षा आहे. कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत असलेल्या रत्नागिरीमध्ये यापूर्वी 9 जणांना कोरोनाच्या डेल्टा प्लस वेरिएंटचा संसर्ग झाला होता. डेल्टा प्लसचे सर्वाधिक रुग्ण पाडललेल्या रत्नागिरीत आरोग्य यंत्रणा अॅलर्ट झाली आहे.
महाराष्ट्र कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमधून सावरत असतानाच राज्यावर कोरोनाच्या डेल्टा प्लस वेरिएंटचं संकट उभं राहिलं. पण या विषाणूने बाधित असलेले रुग्ण बरे झाल्याची देखील माहिती आहे. रत्नागिरी, जळगाव, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डेल्टा प्लसचे रुग्ण बरे झाले आहेत.
व्हायरस काहीही असो, तो नेहमी त्याची अनुवांशिक रचना बदलत राहतो. विषाणू जेव्हा त्याची रचना बदलते, तेव्हा त्याला शास्त्रज्ञ एक नवीन नाव देतात. कोणताही विषाणू त्याचं रुप बदलत असतो. ज्यावेळी लोक विषाणूचा प्रभाव नष्ट करण्यासाठी लस किंवा औषधं घेतात त्यापासून वाचण्यासाठी विषाणूकडून रुप बदलं जातं. मात्र, आपण कायम मास्क वापरणे, हात स्वच्छ ठेवणे, सुरक्षित अंतर ठेवणे या गोष्टी आपल्या हातात आहेत, या गोष्टी केल्यास आपण डेल्टा प्लसपासून बचाव करु शकतो, असं तज्ज्ञांचं मत आहे.
नाशिककरांवर पाणी कपातीचं सावट, शेती कामं मंदावली, पावसाने दडी मारल्यानं चिंता वाढलीhttps://t.co/SgkptJDN8R#Nashik | #NashikRainUpdate | #Rain | #WaterCrisis
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 30, 2021
संबंधित बातम्या:
कोरोनामुळे पालक गमावलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा
Delta Plus Update : महाराष्ट्राला मोठा दिलासा, जळगावसह रत्नागिरीतील रुग्णांची डेल्टा प्लसवर मात
(Ratnagiri Delta Plus Variant 117 samples sent to Delhi lab for test)