मुंबई : अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयाला लागलेल्या भीषण आगीत 11 जणांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेमुळे राज्यात एकच खळबळ उडाली असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (खरात) अध्यक्ष सचिन खरात यांनी मृतांच्या कुटंबीयांना एकूण 20 लाख आणि आगीत होरपळलेल्यांना 10 लाख रुपयांची तात्काळ मदत जाहीर करा, अशी मागणी केली आहे.
“नगर जिल्ह्यात रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला आग लागल्याची घटना अत्यंत दुखद आहे. त्यामुळे या घटनेची सखोल चौकशी करावी आणि दोषींवर कडक करावाई करावी. मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकाला 20 लाख रुपये आणि भाजलेल्या व्यक्तीला 10 लाख रुपयांची तत्काळ मदत जाहीर करा,” असी मागणी सचिन खरात यांनी राज्य सरकारकडे केली.
अहमनदगर रुग्णालयातील दुर्घटनेची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेस दिले आहेत. तसेच त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना तत्काळ पाच लाख रुपये मदत जाहीर केली आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय.
अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयू विभागाला आग लागल्याची घटना घडली. ही आग एवढी भीषण होती की यामध्ये एकूण 11 जणांचा होरपूळून मृत्यू झाला असून काही रुग्ण जखमी झाले आहेत. आगामी काळात मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आग लागल्यानंतर घटनेची माहिती मिळताच अग्नशमन दल घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर वायुवेगाने आग विझविण्याची मोहीम हाती घेण्यात आली. याच वेळेत बाकीच्या 20 जणांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं. नंतर या घटनेची माहिती होताच जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ नगरकडे रवाना झाले होते.
अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयातील आग शॉटसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. दरम्यान, या दुर्घटनेप्रकरणी सखोल चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आयसीयू वॉर्डातआज आग लागून झालेल्या दुर्घटनेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकसंवेदना व्यक्त केली असून याप्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले.
इतर बातम्या :
Ahmednagar Hospital Fire Live : रुग्णालयाला लागलेल्या आगीतील मृतांचा आकडा 11 वर
पोटनिवडणुकीतील पराभवामुळे दरवाढ कमी केल्याचा दावा खोटा; चंद्रकांत पाटलांनी आरोप फेटाळले
(RPI leader sachin kharat demand help of 20 lakh to ahmednagar district hospital fire victim family)