सांगली: महाविकास आघाडी सरकारच्यावतीने विधानसभा व विधानपरिषदेमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शब्द दिलेला होता की 31 जुलै च्या अगोदर आम्ही या राज्यातील MPSC च्या सर्व जागा भरू आणि रखडलेल्या नियुक्त्या सुद्धा दिल्या जातील. MPSC साठी जो आयोग आहे त्यावरील सदस्य सुद्धा आम्ही तातडीने त्यांचीही नियुक्ती करू असा शब्द सभागृहाला दिला होता. मात्र, मविआ सरकारनं शब्द न पाळल्यामुळं त्यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी दिला आहे.
एमपीएससी संदर्भात एकही शब्द महाविकास आघाडी सरकारच्यावतीने पाळला गेला नाही. खोट बोल पण रेटून बोल अशा पद्धतीचा कारभार या राज्यातल्या सरकारचा चालला आहे. अजून किती स्वप्नील लोणकर सारख्या आत्महत्या या सरकारला पाहिजे आहेत. कारण हे सरकार खऱ्या अर्थाने जनतेचा विश्वासघात करणारे सरकार आहे. परंतु आम्ही या सरकारला स्वस्थ बसू देणार नाही, असा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला.
15 ऑगस्ट पर्यंत MPSC च्या परीक्षा जाहीर केल्या नाहीत व ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या आहेत अशांना नियुक्ती पत्र दिले नाही व आयोगावरील सदस्य नेमले नाहीत तर 15 ऑगस्ट पासून राज्यव्यापी आंदोलन महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात राज्यातील विद्यार्थ्यांना घेऊन करू. असा इशारा सदाभाऊ खोत यांनी या माध्यमातून सरकार दिला आहे.
राज्य सरकार 31 जुलैपर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील (एमपीएससी) रिक्त सदस्य भरणार आहे, अशी घोषणा विधानसभेत करण्यात आली होती. मात्र 31 जुलै तारीख संपत आली असताना देखील राज्य सरकारकडून अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली दिसून येत नाही. त्यावर स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली असून विधीमंडळात केलेल्या घोषणेचा विसर पडलाय का? असा सवाल विद्यार्थ्यांनी विचारला आहे. तर, दुसरीकडे विरोधी पक्षातील नेतेही आक्रमक झाले आहेत. भाजपा नेते निलेश राणेंनी ट्विट करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य केलं आहे.
इतर बातम्या:
Sadabhau Khot slammed MVA and Ajit Pawar over delay in MPSC appointment