सांगली : सांगलीच्या (Sangli) पलूस तालुक्यातील औदुंबर, भिलवडी, चोपडेवाडी नदीकाठी निसर्गप्रेमींना जवळपास दहा लहान मोठ्या मगरी पहायला मिळाला आहेत. या मगरींचा आकार साधारण सहा फुटांपासून ते तेरा चौदा फुटांपर्यंत असल्याचे देखील सांगण्यात येतंय. यंदा कृष्णा नदीची (Krishna River) पाणीपातळी स्थिर असल्याने मगरींच्या स्थलांतराला मोठा ब्रेक मिळालायं. गेल्या काही वर्षांत 20 जुलै ते 15 ऑगस्ट दरम्यान कृष्णा नदी पात्राबाहेर पुरस्थिती असायची. अशावेळी मगरी (Crocodile) आजूबाजूला चरी, ओढे, वगळी शेतांमध्ये दिसायच्या.
यंदा मात्र पाणीपातळी स्थिर असल्याने मगरींना आपला अधिवास सोडावा लागलेला दिसत नाही. कृष्णा नदीत सातत्याने कारखाण्यातील सोडल्या जाणाऱ्या रासायनिक मळीच्या जलप्रदूषणामुळे लाखो मासे मृत होण्याचे प्रकार घडत आहेत. तसेच नदीत इतर मास्यांचे मत्सबीज खाणाऱ्या खिलापीया मास्यांची संख्या वाढत आहे. अशावेळी नदीतील इतर मासे नष्ट होण्याची भिती निर्माण झालीयं. मात्र या खिलापीया मास्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवणारी मगर ही अत्यंत महत्त्वाची जैव नियंत्रक आहे.
कृष्णा नदीमध्ये मगरीचे अस्तित्व अत्यंत महत्वाचे आहे. कृष्णाकाठी गावागावातील गटारगंगा नदीच्या पाण्यात मिसळते. त्या ठिकाणी खिलापीया मासे प्रचंड वाढले आहेत. ते खाण्यासाठी गेल्या दोन तीन वर्षात मगरींचा पाणवठ्यावर वावर वाढला असल्याने संदीप नाझरे यांनी सांगितले. मगर ही सरहद्द प्रिय वण्यजीव आहे. सहजासहजी ती तिचा नैसर्गिक अधिवास सोडत नाही. महापूरासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या अपवादात्मक काळात स्थलांतर करत असते. आजूबाजूच्या ओढा वगळीतून स्थलांतर केलेल्या मगरी या पूराचे पाणी ओसरताच परत नदीपात्रात येतात.