सांगली: तासगाव आणि नागेवाडी कारखान्याची थकीत बिले सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात होईल. त्याचबरोबर एकही शेतकऱ्यांचे पैसे बुडणार नाहीत,असा विश्वास खासदार संजयकाका पाटील यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. थकीत बिलांबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सागंली जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. खासदार संजयकाका पाटील यांनी त्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे. (Sanjaykaka Patil said Tasgaon and Nagewadi sugar mill transfer bill from Monday after protest warning of Swabhimani Shetkari Sanghatna)
तासगाव आणि विटयाच्या नागेवाडी साखर कारखान्यांकडून गेल्या सहा महिन्यांपासून शेतकऱ्यांची उसाची बिल देण्यात आलेले नाहीत. या थकीत बिलाच्या मागणीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून खासदार संजय काका पाटील यांच्या मालकीच्या कारखान्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले होते.त्यानंतर संजय काका पाटील यांनी शुक्रवारपर्यंत पैसे जमा करण्याचं आश्वासन दिलं होतं.मात्र तरीही पैसे जमा झाले नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने 21 जून ला सोमवारी खासदार संजयकाका पाटील यांच्यावर आरोप करत घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा महेश खराडे यांनी दिला आहे.
खासदार संजयकाका पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन तासगाव आणि नागेवाडी या दोन साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चार अधिक पैसे मिळतील यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. तसेच या दोन्ही कारखान्यांच्या माध्यमातून उपपदार्थ बनवण्याचे प्रकल्प उभारण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. केंद्राकडूनही याला मान्यता मिळाली आहे,हे प्रकल्प उभारन्यासाठी केलेल्या गुंतवणूक यामुळे शेतकऱ्यांची बिल देण्यास विलंब झाला. त्याबद्दल आपण दिलगिरी व्यक्त करतो, असं संजयकाका पाटील म्हणाले.
शेतकऱ्यांचे पैसे कोणत्याही परिस्थितीत बुडणार नाहीत,लवकरच या दोन्ही कारखान्याच्या माध्यमातून उपपदार्थ निर्मितीचे प्रकल्प उभारून शेतकऱ्यांना चांगला दर देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचेही ग्वाहीही संजयकाका पाटील यांनी दिली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आलेल्या आरोपांचे खंडन करत कोणताही उद्योग आपण लपून केला नसल्याचेही खासदार संजयकाका पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
वाढवण बंदराच्या सर्वेक्षणाला स्थगिती, तज्ज्ञांची समिती स्थानिक नागरिकांशी संवाद साधणारhttps://t.co/FnjjE8SfMS#WadhwanPort | #Palghar | #Wadhawan |
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 19, 2021
संबंधित बातम्या:
मुख्यमंत्री म्हणाले, स्वबळाची भाषा केली तर लोक जोड्यानं हाणतील, त्यावर नाना पटोले म्हणतात…
(Sanjaykaka Patil said Tasgaon and Nagewadi sugar mill transfer bill from monday after protest warning of Swabhimani Shetkari Sanghatna)