गणेश सोळंकी, प्रतिनिधी, बुलढाणा : दीपक बुटे यांची राज्य लोकसेवा आयोग मार्फत पहिल्याच प्रयत्नात MPSC मधून कृषी उपसंचालक पदी निवड झालीय. दीपक हे बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील पळसखेड येथील गरीब कुटुंबातील आहेत. दीपक यांचे 4 थी पर्यंत शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. Bsc(Agri) पदवीचे शिक्षण श्री शिवाजी कृषी महाविद्यालय अमरावती येथे पूर्ण केले. त्यानंतर Msc (Agri) चे शिक्षण त्यांनी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे पूर्ण केले.
शिक्षण पूर्ण करत असतानाच दीपक याने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ध्येय पूर्तीचा वसा घेतला. स्पर्धा परीक्षेतून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षेमध्ये पहिल्याच प्रयत्नात MPSC मधून कृषी उपसंचालक पदी निवड झाली.
पळसखेड येथील दीपक अनंता बुटे यांची राज्य लोकसेवा आयोगमार्फत पहिल्याच प्रयत्नात MPSC मधून कृषी उपसंचालक (राजपत्रित अधिकारी वर्ग -१) पदी निवड झाली आहे. 5 वी ते 7 वी पर्यंतच शिक्षण केंद्रीय वरिष्ठ माध्यमिक प्राथमिक शाळा मडाखेड येथे झाले.
तसेच 8 वी ते 12 वी पर्यंतचे शिक्षण दी न्यू इरा हायस्कूल जळगाव जामोदमध्ये झाले. त्यानंतर Bsc(Agri) पदवीचे शिक्षण श्री शिवाजी कृषी महाविद्यालय अमरावती येथे पूर्ण केले. शिक्षण पूर्ण करत असताना दीपक यांना महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विशेष मार्गदर्शन लाभले.
तत्पूर्वी दीपक यांचे कॅनरा बँकेत Afo म्हणून सिलेक्शन झाले होते. त्यानंतर कृषी उपसंचालक राजपत्रित अधिकारी वर्ग 1 पदी निवड झाली. परिस्थितीचे भांडवल केले नाही. अपयशाला दोष दिले नाही. सोशल मीडियाच्या व्यसनापासून स्वतः ला दूर ठेवले. आपल्या कर्माला एकनिष्ठ राहून या तरुणाने करून दाखवले.
कृषी उपसंचालक म्हणून निवड झाल्यानंतर आई-वडिलांच्या डोळ्यांतील आनंदाश्रू वाहू लागले. पालकांचा सगळा थकवा, व्यथा, वेदना वाहून गेल्या. नव्याने आयुष्य जगण्याची उभारी त्या आई वडिलांना निश्चितच मिळाली.