रत्नागिरी: महाविकास आघाडीत सारं काही अलबेल असल्याच दावा आघाडीतील नेते करत असले तरी ग्राऊंड लेव्हलला मात्र चित्रं काही वेगळच असल्याचं दिसत आहे. आता हेच पाहा ना शिवसेनेचे भास्कर जाधव आणि राष्ट्रवादीचे सुनील तटकरे हे दोघेही आघाडीचे मातब्बर नेते. पण या दोन्ही नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. कोकणातील विधान परिषदेची जागा कुणबी समाजाला सोडावी अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली. त्याला तटकरे यांनी विरोध केला. त्यामुळे जाधव संतापले आणि त्यांनी तटकरेंवर हल्लाबोल केला. कुणबी समाजाला जागा द्या म्हटलं तर तुम्हाला मिरची का लागली? असा सवाल करतानाच तुझको मिर्ची लगी तो मै क्या करूँ, असं म्हणत भास्कर जाधवांना तटकरेंना टोला हाणला.
रायगड लोकसभा मतदार संघाचे खासदार सुनिल तटकरे आणि गुहागर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्या जोरदार शाब्दिक युद्ध रंगले आहे. विधान परिषदेची जागा कुणबी समाजाला सोडावी या भास्कर जाधवांच्या मागणीमुळे सुनील तटकरे आणि भास्कर जाधव यांच्यातला वाद उफाळला आहे. कुणबी समाजाला एक जागा सोडा म्हटल्या नंतर सुनील तटकरेना मिरच्या का झोंबल्या? तुझको मिर्ची लगी तो मै क्या करूँ? केवळ नाव राष्ट्रवादी, पण काम मात्र कुटुंबवादी, अशी टीका जाधव यांनी केली.
सुनिल तटकरे यांच्यावर खोट्या कंपन्यां स्थापन करून लोकांच्या हजारो एकर जमीनी लाटल्याचे आरोप आहे. 10 ते 15 हजार कोटींची बेहिशोबी माया गोळा केल्याचेही आरोप तटकरे यांच्यावर आहे. त्यामुळे अशा माणसाला मार्गदर्शन करण्याची माझी कुवत नाही, असा हल्लाच जाधव यांनी चढवला आहे. मार्गदर्शन करण्यासाठी समोरच्याकडे जाण्यासाठी जाणीव आणि नीतिमत्ता लागते आणि सुनिल तटकरे यांच्याकडे यातलं काहीच नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
तटकरे यांना फक्त घ्यायचं माहिती आहे. द्यायचं माहीत नाही. तटकरे यांना खासदार करण्यात माझं योगदान आहे. माझ्या कोणत्याही विजयात सुनील तटकरे यांचं योगदान नाही. उलट मला पाडण्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी काड्या केल्या. मदत करणाऱ्यांचंच त्यांनी कायम वाटोळं केलं, असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. यावेळी जाधव यांनी दिवंगत आमदार माणिकराव जगताप आणि बॅरिस्टर अंतुले यांचे उदाहरण दिले. तटकरे स्वतःला राष्ट्रवादीचा फाऊंडर मेंबर म्हणवतात, पण ते सत्य नाही. सुनील तटकरे हे मूळचे काँग्रेसचे आहेत, असा टोलाही त्यांनी हाणला.
VIDEO : महत्त्वाच्या घडामोडी | 30 November 2021 #FastNews #News pic.twitter.com/AQHCCsHufT
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 30, 2021
संबंधित बातम्या:
‘2024 ला भाजप स्वबळावर सत्तेत येणार’, देवेंद्र फडणवसींच्या दाव्याची नवाब मलिकांकडून खिल्ली
सोन्याच्या दागिन्यांशी संबंधित नवा नियम 1 डिसेंबरपासून लागू, पालन न झाल्यास होणार तुरुंगवास