तळीये ग्रामस्थांच्या पुनर्वसन प्रस्ताव तयार; लवकरच 60 घरांचे पुनर्वसन, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

| Updated on: Jul 31, 2021 | 10:30 PM

महाड - तळीये या गावातील ग्रामस्थांचे सुरक्षित जागी पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव तयार असून लवकरच 60 घरांचे पुनर्वसन नवीन जागी केलं जाईल, अशी ग्वाही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

तळीये ग्रामस्थांच्या पुनर्वसन प्रस्ताव तयार; लवकरच 60 घरांचे पुनर्वसन, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
एकनाथ शिंदे
Follow us on

रायगड: महाड – तळीये या गावातील ग्रामस्थांचे सुरक्षित जागी पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव तयार असून लवकरच 60 घरांचे पुनर्वसन नवीन जागी केलं जाईल, अशी ग्वाही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी आणलेली जीवनावश्यक वस्तूंची मदत देण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी तळीयेला पुन्हा एकदा भेट दिली. यावेळी त्यांनी महाड सत्र न्यायालयाच्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी 50 लाख रुपयांचा निधी देण्याचीही घोषणा केली.

महाडमध्ये झालेल्या प्रलयंकारी पावसामुळे तळीये गावात दरड कोसळून त्यात 85 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या गावांचे पुनर्वसन करण्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला होता. पुण्यातील आंबेगाव येथील माळीण गावाप्रमाणेच तळीयेचे देखील लवकरात लवकर पुनर्वसन करण्याची मागणी होत होती.

आणखी पाच वाड्यांची पुनर्वसनाची मागणी

तळीये दुर्घटना घडली त्याच डोंगराच्या दुसरीकडील भागाला देखील भेगा पडल्या असल्याची माहिती ग्रामस्थांनी एकनाथ शिंदे यांना दिली. ही भेग तीन किलोमीटर पर्यंत लांब असल्याने या कड्याच्या पायथ्याशी असलेल्या शिंदे आवड, कुम्हण अळी, खालचे आवाड, मधले आवाड आणि तळीये म्हणजेच कोंडाळकर आवाड अशा पाच वाड्यांचे पुनर्वसन करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून नक्की सकारात्मक निर्णय घेऊ, अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली.

महाड कोर्टाच्या दुरुस्तीसाठी 50 लाखांचा निधी

महाड मधील सत्र न्यायालयाच्या इमारतीचे देखील या पुरात अतोनात नुकसान झाले आहे. पुरामुळे नदीलगतची कोर्टाची इमारत पाण्याखाली गेल्याने आतील दालने व फर्निचरचे नुकसान झाले आहे. कोर्टातील कागदपत्रेही पाण्याखाली गेली होती. एकनाथ शिंदे यांनी शनिवारी या इमारतीला भेट देऊन पाहाणी केली. खराब झालेल्या गोष्टींची लवकरात लवकर दुरुस्ती करून इमारतीतून कामकाजाला पुन्हा सुरुवात व्हावी, यासाठी नगरविकास विभागाच्या माध्यमातून 50 लाख रुपयांचा विशेष निधी देण्याची घोषणा एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली.

इतर बातम्या:

बाळासाहेबांचं शिवसेना भवन राहिलं नाही, ते तर कलेक्शन ऑफिस; नितेश राणेंचा हल्लाबोल

नितेश राणे म्हणाले अनिल देशमुख व्हायचंय का? केसरकरांकडून खाजवून खरूज न काढण्याचा सल्ला

Shivsena leader Eknath Shinde said Taliye village rehabilitation plan proposal ready govt will rehabilitate sixty homes