बुलडाणा : शेगाव संस्थानचे विश्वस्त शिवशंकर भाऊ पाटील (Shivshankar Bhau Patil) यांचे दुखद निधन झाले आहे. ते 82 वर्षांचे होते. कोरोनाचे निर्बंध असल्यामुळे त्यांच्या अंत्यविधीसाठी मोजक्याच भक्तांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे अंत्यविधीसाठी शेगाव येथे कोणीही गर्दी करु नये, असे आवाहन शेगाव संस्थांच्या (Shegaon Sansthan) वतीने सांगण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर घरीच उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. (Shivshankar Bhau Patil Trustee of Shegaon Sansthan passed away at age of 82 years)
शिवशंकर पाटील मागील काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर घरीच उपचार केले जात होते. मात्र, उपचारादरम्यान वयाच्या 82 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. घराजवळ असलेल्या शेतात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पाटील यांच्याकडून संत गजानन महाराज यांची सेवा झालेली आहे.
श्री गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकर भाऊ पाटील यांच्या निधनाचे वृत्त दु:खद आहे. त्यांनी केलेले समाजकार्य अजरामर आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ? pic.twitter.com/qbTcJjyR8h
— Office Of Manikrao Thakare (@OfficeOfThakare) August 4, 2021
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शिवशंकर भाऊ पाटील यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. श्री संत गजानन महाराज शेगांव संस्थानचे विश्वस्त शिवशंकर भाऊ पाटील यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दु:ख झाले. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. शिवशंकर भाऊ यांनी समर्पित वृत्तीने व प्रामाणिकपणे श्री गजानन महाराजांच्या विचारांचा वारसा जोपासला, असं नितीन गडकरी म्हणाले.
शिवशंकर पाटील यांच्या निधनानंतर सर्व स्तरातून दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनते देवेंद्र फडणवीस यांनी पाटील यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. “श्री संत गजानन महाराज संस्थान, शेगावचे प्रमुख शिवशंकर भाऊ पाटील यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. त्यांच्या निधनाने एक व्रतस्थ सेवेकरी, मॅनेजमेंट गुरू, निष्काम कर्मयोगी आपण गमावला आहे. शिवशंकर भाऊ हे समर्पण भावाचे मूर्तिमंत होते. शेगावला जायचो तेव्हा अनेकदा त्यांची भेट व्हायची. प्रत्येकवेळी आपुलकीने विचारपूस करायचे, शेगाव संस्थानचे प्रश्न सोडवून घ्यायचे. मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या कार्याला हातभार लावण्याची संधी मिळणे हे माझे भाग्य होते. महाजनादेश यात्रेप्रसंगी सुद्धा शेगावला दर्शनाला गेलो, तेव्हा त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा झाल्या होत्या. त्यांच्या निधनाने मी व्यक्तिगत मार्गदर्शकाला मुकलो आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,” असा शोकसंदेश फडणवीस यांनी दिला आहे.
इतर बातम्या :
राज ठाकरेंच्या भाषणाची CD ऐकली, पुण्यात युती आणि मुंबईत फटका असं होऊ नये : चंद्रकांत पाटील
(Shivshankar Bhau Patil Trustee of Shegaon Sansthan passed away at age of 82 years)