नंदुरबार : नंदुरबार (Nandurbar) हे गुजरात राज्याच्या सीमेवर लागून आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांचा उपद्रव सुरू असतो. हे वन्यप्राणी मानवास हानिकारक ठरत आहेत. एकीकडे पिकांचे नुकसान करतात, तर दुसरीकडे काही वन्यप्राणी हे मानवाला इजा पोहचवत असतात. देवमोगरा पुनर्वसन भागात तर एका सात वर्षीय बालकाला बिबट्याने आपली शिकार केली. त्यामुळे या परिसरातील नागरिक आक्रमक झाले. त्यांनी बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली. गुजरात वनविभागाने एका बिबट्याला (Leopard) जेरबंद केले. पण, अजून दुसरा बिबट्या या परिसरात दहशत (Leopard Terror) पसरवत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत आहेत.
अक्कलकुवा तालुक्यातील देवमोगरा पुनर्वसन शिवारातील एका सात वर्षाच्या बालकाला बिबट्याने हल्ला करून जीवे ठार मारले होते. या परिसरातील नागरिकांकडून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी मागणी केली जात होती. त्यासाठी गुजरात वनविभागाने तात्काळ पिंजरा लावून बिबट्याला जेलबंद केलं आहे.
देवमोगरा पुनर्वसन या गावातील सात वर्षाच्या सुरेश पाडवी हा जेवण करत असताना बिबट्याने हल्ला केला. त्याला फरफडत नेऊन त्याला बिबट्याने ठार केले. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं. या बिबट्याला तात्काळ जेरबंद करावी अशी मागणी केली जात होती.
नागरिकांनी या बिबट्याची तक्रार वनविभागाकडे केली होती. मात्र महाराष्ट्राच्या वन विभागाकडून दुर्लक्ष करण्यात येत होतं. बिबट्याने नागरी वस्तीत शिरूर हल्ला केल्याने गुजरात वनविभाग सतर्क झाले. बिबट्याला तात्काळ पिंजरा लावून जेलबंद करण्यात आले आहे.
बिबट्याला जेरबंद केल्याने परिसरातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र या परिसरात आणखीन बिबट्या असल्याने वन विभागाकडून सतर्क राहण्याचा आवाहन करण्यात आले आहे. एक बिबट्या गेला तरी दुसरा बिबट्या तयार आहे. त्यामुळे किती बिबट्यांचा सामना करायचा असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.