पालघर : पालघरमध्ये एका 19 वर्षीय आदिवासी महिले (Tribal Women)वर बलात्कार (Rape) झाल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपीं विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिला जव्हार तालुक्यातील एका गावातील असून दोन जणांनी रविवारी तिला शेतातील धान्य गोदामात नेऊन तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. त्यानंतर या घटनेची वाच्छता कुठे करुन नये यासाठी तिला धमकावले. कुणाला काही सांगितल्यास जीवे ठार मारु असे महिलेला सांगितले. आरोपींच्या धमकीमुळे महिला खूप घाबरली. तिने याबाबत कुटुंबियांनाही काही सांगितले नाही. मात्र या घटनेनंतर तिच्या बदललेले वागणे आणि हावभाव पाहून कुटुंबियांना संशय आला. त्यानंतर घरच्यांनी विश्वासात घेऊन तिची विचारपूस केली असता तिने घडला प्रकार कथन केला. त्यानंतर महिलेच्या घरच्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. (Tribal woman raped in Palghar, two accused arrested)
बलात्कार प्रकरणी पोलिसांनी सोमवारी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र अद्याप आरोपींना अटक करण्यात आली नाही. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. आरोपींचा शोध सुरु असून लवकरात आरोपी पकडले जातील, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पीडित महिला रविवारी आपल्या गावातून कामावरून चालली होती. दरम्यान, दोघांनी तिला पकडून जवळच असलेल्या धान्य गोदामात नेले आणि दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. सोबतच हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. सुरुवातीला घाबरून संबंधित महिलेने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. मात्र घरच्यांनी तिला समजावले आणि तिच्या घाबरण्याचे कारण विचारले असता तिने संपूर्ण घटना सांगितली.
उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या एका 75 वर्षीय महिलेचा वॉर्डबॉयने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना वॉर्डबॉयने तिचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी महिलेच्या मुलीच्या तक्रारीवरुन वृद्धेचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी वॉर्डबॉयला रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. कानादास वैष्णव असे अटक करण्यात आलेल्या वॉर्डबॉयचे नाव आहे. डोंबिवलीतील स्पर्श हॉस्पिटलमध्ये हा धक्कादायक प्रकार घडल्याने एकच खळबळ माजली आहे. (Tribal woman raped in Palghar, two accused arrested)
इतर बातम्या
मानलेल्या आईच्या सांगण्यावरुन बायकोला मारहाण, राष्ट्रवादीच्या बीड महिला जिल्हाध्यक्षावर गुन्हा
VIDEO | ‘पुष्पा’चा नाशिकमध्ये धुमाकूळ; शेतकऱ्यांना 60 लाखांचे लावले चंदन, प्रकरण काय?