दोन राऊतच शिवसेनेला पार खोल डुबवणार, नारायण राणेंचा हल्लाबोल

| Updated on: Aug 27, 2021 | 4:12 PM

केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज शिवसेना नेते संजय राऊत आणि विनायक राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. (Narayan Rane)

दोन राऊतच शिवसेनेला पार खोल डुबवणार, नारायण राणेंचा हल्लाबोल
Narayan Rane
Follow us on

रत्नागिरी: केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज शिवसेना नेते संजय राऊत आणि विनायक राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. संजय राऊत आणि विनायक राऊत हे दोन राऊत शिवसेनेला पार खोल बुडवणार आहेत, असा हल्लाबोल नारायण राणे यांनी केला. (Union minister Narayan Rane attacks sanjay raut and vinayak raut)

नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन हा हल्लाबोल केला. संजय राऊत आणि विनायक राऊत हे दोघेही माझ्या दृष्टीने वायफळ बडबड करणारे नेते आहेत. संजय राऊतांना त्याचसाठी ठेवलंय. संपादक सोडा त्यांना हे बोलायलाच ठेवलंय. काय तो विनायक राऊत. ते दोन राऊतच शिवसेनेला डुबवणार आहेत. आतमध्ये एकदम खोल तलावात, अशी टीका राणे यांनी केली. विनायक राऊतांचं नाव घेऊन तुम्ही मूड खराब करता. त्यामुळे मला संध्याकाळचं जेवण टाळावं लागेल, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

आयडॉलॉजी स्वीकारूनच भाजपात

भाजपमधील बाहेरच्या घुसखोरांनी वातावरण खराब केल्याची टीका संजय राऊत यांनी केली होती. त्यावरही राणेंनी पलटवार केला. भाजपची ओरिजिनल आयडॉलॉजी स्वीकारूनच आम्ही पक्षात प्रवेश केला आहे. ओरिजिनल असो काही असो भाजपला परवडतोय ना आम्ही. मग या बाहेरच्यांचं काय ऐकायचं, असा सवालही त्यांनी केला.

शिवसेनेतील अनेकजण वेटिंगवर

यावेळी त्यांनी शिवसेनेतील अनेकजण भाजपमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक असल्याचं म्हटलं आहे. येतील त्या सर्वांना आम्ही पक्षात घेणार आहोत. ते सगळे वेटिंग लिस्टवर आहेत. कुणाला न घ्यावं हे आम्ही ठरवणार आहोत, जन आशीर्वाद यात्राही कुणाच्याही प्रवेशासाठी नव्हती. केंद्राची कामं लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी होती. त्यामुळे या यात्रेत कुणाला प्रवेश देण्यात आला नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

सर्वच बोललो तर ते परवडणार नाही

राणेंच्या पाठी लागू नका. नाही तर मी आता थोडंच बोलतोय. नाही तर सर्वच बोलावं लागेल. ते परवडणार नाही. केसेस काढू हे काढू. अरे मी एवढाच क्रिमिनिल होतो तर मुख्यमंत्री कसं केलं? मंत्री, आमदार, नगरसेवक शाखाप्रमुख कसं केलं? पहिली पदं तुम्हीच दिली ना तेव्हा विरोध का केला नाही? 39 वर्षात शिवसेनेसाठी जे काही केलं… साहेबांना जेव्हा अतिरेक्याकंडून धोका होता, साहेबांना जेव्हा मातोश्री सोडायला सांगितलं. तेव्हा साहेबांनी सुपुत्राला सोबत घेतलं नाही, असं ते म्हणाले. (Union minister Narayan Rane attacks sanjay raut and vinayak raut)

 

संबंधित बातम्या:

आम्ही विरोधी पक्षात बसायला जन्माला आलो नाही, आम्हीही सत्तेत येऊ; नारायण राणे कडाडले

राजकारणात वातावरण बदल होतोय, काही विषाणुही येतायेत, आमच्यासाठी विषय संपला: आदित्य ठाकरे

बाहेर शिवसेना-राणेंमध्ये राडा, फडणवीस-मुख्यमंत्र्याची बंद दाराआड चर्चा; तर्कवितर्कांना उधाण

(Union minister Narayan Rane attacks sanjay raut and vinayak raut)