VIDEO : चर्चा तर होणारच! हेल्मेट घातलेला रेडा बघितला आहे का? पाहा हा व्हिडिओ!

| Updated on: Dec 15, 2021 | 10:30 AM

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हेल्मेटसक्ती आहे. मात्र, हेल्मेटसक्ती असूनही अनेक लोक विना हेल्मेट प्रवास करतात. हेल्मेट न घातल्यामुळे दंड देखील आकारला जातो तरीही लोक हेल्मेट वापरत नाहीत. मात्र कोल्हापुरमध्ये चक्क एका रेड्यानेच हेल्मेट घातले आहे.

VIDEO : चर्चा तर होणारच! हेल्मेट घातलेला रेडा बघितला आहे का? पाहा हा व्हिडिओ!
रेडा
Follow us on

मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हेल्मेटसक्ती आहे. मात्र, हेल्मेटसक्ती असूनही अनेक लोक विना हेल्मेट प्रवास करतात. हेल्मेट न घातल्यामुळे दंड देखील आकारला जातो तरीही लोक हेल्मेट वापरत नाहीत. मात्र कोल्हापुरमध्ये चक्क एका रेड्यानेच हेल्मेट घातले आहे. पण तुम्ही कधी हॅम्लेट घातलेला रेडा पहिला आहे का? नाही ना? मग तुम्हाला चक्क हेल्मेट घातलेला रेडा आज बघायला मिळणार आहे.

या रेड्याचे डोके बघा आणि काय ते आपणच ठरवा. कोल्हापूरच्या गडहिंग्लज याठिकाणी अर्जुन समूहाकडून सुंदर म्हैस आणि सुंदर रेडा स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, या स्पर्धेत सगळ्यांचे लक्ष वेधून घेतल एका खास रेड्याने. या रेड्याच्या डोक्याची ठेवण हेल्मेट सारखी आहे. जणू या रेड्याने हेल्मेट घातले आहे की काय असा प्रश्न तेथे उपस्थित असलेल्या लोकांना पडला होता.

जाफराबादी गीर जातीचा हा रेडा असून दोन वर्षांचा आहे. गडहिंग्लज मधील या स्पर्धेत हेल्मेट भोला याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. कोल्हापूरच्या हा रेड्याची चर्चा मात्र, सर्वत्र रंगली आहे. हा खास रेडा बघण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. रस्ते अपघातात डोक्याला मार लागल्याने दुचाकीस्वारांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडतात. अनेकदा अपघात किरकोळ असतो, मात्र डोक्याला मार लागल्याने दुचाकीस्वारांचा जीव जातो. त्यामुळे दुचाकी चालवताना हेल्मेट घालणं आवश्यक आहे.

संबंधित बातम्या : 

VIDEO : बैलगाडीतून नवरी निघाली लग्नाला, इंदापूर तालुक्यातील अनोखा लग्न सोहळा…

जिल्ह्यात मद्यप्रेमींची संख्या वाढली ; मात्र मद्य परवाना न घेता ‘पिणारे’ अधिक