वाशिम : कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेचा लहान मुलांना प्रादुर्भाव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर वाशिम जिल्हा पोलीस प्रशासनाने अनेक उपाययोजनांची तयारी सुरु केली आहे. घराबाहेर कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबियांचे लसीकरण करा. तसेच वेळोवेळी आरोग्य तपासणी करण्यावर भर द्या, अशी सूचना जिल्हा पोलिस अधिक्षक वसंत परदेशी यांनी दिली आहे. (Washim District Police Administration Started Preparation For Corona Third Wave)
तिसऱ्या लाटेत लहान मुलांना जास्त धोका
वाशिम जिल्ह्यात कोरोना रुग्णाच्या संख्येत घट होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून निर्बंध हटवण्यात आले आहे. त्यामुळे अनेक नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. मात्र येत्या काळात कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. यापासून लहान मुलांना जास्त धोका असल्याचे बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस विभागाने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.
कर्मचाऱ्यांचे 100 टक्के लसीकरण करा
रात्रंदिवस जनतेच्या रक्षणासाठी झटणारे पोलिस बांधव आणि त्यांचे कुटुंबीय तिसऱ्या लाटेपासून सुरक्षित राहावे यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस कर्मचारी यांनी घरात जाण्यापूर्वी अंघोळ करून किंवा सॅनिटायझ करावे, अशी सूचना दिली आहे.
यामुळे घरातील लहान मुले किंवा इतर सदस्यांना संसर्ग होणार नाही. तसेच सर्व कर्मचाऱ्यांचे 100 टक्के लसीकरण करण्याचे निर्देश देण्यात आल्या आहेत. कर्तव्यावर असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वेळोवेळी आरोग्य तपासणी करता यावी, यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे, असे जिल्हा पोलिस अधिक्षक वसंत परदेशी यांनी सांगितले.
वाशिम पोलिस दलाला कोरोनाचा घट विळखा
वाशिम जिल्ह्यात कोरोना रुग्णाच्या संख्येत घट होत आहे. मात्र तरीही काळजी घेणं गरजेचे आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत पोलीस दलालाही कोरोनाचा घट विळखा बसला होता. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत 540 पोलीस अधिकारी कोरोनाबाधित झाले होते. त्यात एका व्यक्तीचा मृत्यूही झाला होता.
देशात येत्या 6 ते 8 आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट येणार, लाट रोखणं अशक्य; ‘एम्स’च्या प्रमुखाने दिला इशाराhttps://t.co/tsdOnwWEe5#drrandeepguleria | #AIIMS | #CoronaVirusUpdates | #ThirdWaveCovid | #CoronavirusIndia
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 19, 2021
(Washim District Police Administration Started Preparation For Corona Third Wave)
संबंधित बातम्या :
औरंगाबाद शहरात सक्तीचे लसीकरण ? 21 जूनपासून 18 वर्षांवरील नागरिकांना लस देण्याचे नियोजन
पुण्यात शनिवार, रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद, वाढत्या गर्दीमुळे महापालिकेचा निर्णय
Mumbai Unlock: मुंबईतील व्यापारी ठाकरे सरकारवर नाराज; निर्बंध शिथील करण्याची मागणी