सांगली : मुसळधार पावासामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत अचानकपणे मोठी वाढ झाली आहे. मिळालेल्या ताज्या माहितीनुसार गुरुवारी (22 जुलै) रात्री 11 वाजेपर्यंत कृष्णा नदीची पाणीपातळी तब्बल 30 फुटांवर जाऊन पोहोचली आहे. झपाट्याने नदीची पाणीपातळी वाढल्यामुळे सुर्यवंशी प्लॉटमध्ये पाणी शिरले आहे. तर बाकीच्या 15 घरांचे तातडीने स्थलांतर करण्यात आले आहे. नदीच्या पाणीपातळीत वाढत होत असल्यामुळे सध्या नदीकाठच्या नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Water level of Krishna river increased up to 30 feet sangli municipal corporation appeal citizens to go to a safe place)
सांगलीत गुरूवारी (22 जुलै) सायंकाळी 7 च्या सुमारास पाणीपातळी 27 फुटांवर पोहोचली होती. तेव्हापासून महापालिका प्रशासनाकडून खबरदारी म्हणून पूर पट्ट्यातील नागरिकांना स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. आता कृष्णेची पाणीपातळी 30 फुटांवर पोहोचली असून ती आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुराच्या पाण्यामुळे बाधित होणाऱ्या सुर्यवंशी प्लॉट, मगरमच्छ कॉलनीमध्ये महापालिका टीमकडून मेगा फोनद्वारे नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचे आवाहन जात केले आहे.
याचबरोबर ज्यांच्याकडे राहाण्याची सोय नाही, अशा नागरिकांसाठी महापालिकेने शाळा क्रमांक 14 आणि शाळा क्रमांक 24 या दोन ठिकाणी तात्पुरता निवारा केंद्र सुरू केले आहे. कृष्णेची पाणीपातळी आणखी वाढणार असल्याने महापालिका प्रशासन सज्ज झाले असून महापालिकेचे वैद्यकीय, आपत्कालीन तसेच अग्निशमन विभागाकडून पूर स्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.
दरम्यान, राज्यात अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. अशावेळी शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी दत्त मंदिरात पाणी शिरलं आहे. शिरोळ तालुक्यातील कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होत आहे. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाल्याने नृसिंहवाडी इथल्या दत्त मंदिरातही पुराचं पाणी शिरलं. दत्ताच्या पादुकावर कृष्णेचं पाणी उत्तर द्वारातून जात दक्षिणदारातून बाहेर पडल्यानं चालू मोसमातील दुसरा दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला.
इतर बातम्या :
Big Breaking | महाडमध्ये दरड कोसळली, 30 घरे मातीखाली दबल्याने 72 नागरिक बेपत्ता असल्याचा अंदाज
Maharashtra Rain Live | खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग आणखी वाढवला, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
(Water level of Krishna river increased up to 30 feet sangli municipal corporation appeal citizens to go to a safe place)