लातूर : गावठी कट्टा घेऊन फिरणाऱ्या एका युवकाला लातूर ग्रामीण पोलिसांनी अटक केली. हा तरुण लातूर जवळच्या भातांगळी गावातील रहिवासी आहे. पोलिसांनी या युवकाला ताब्यात घेतलं असलं तरी तो रस्त्याने गावठी कट्टा घेऊन का फिरत होता ? याची स्पष्ट माहिती मिळू शकलेली नाही. पोलीस याचा तपास करत आहेत. (young boy carrying pistol arrested by police in Bhatangali village of Latur district)
मिळालेल्या माहितीनुसार लातूर शहराच्या जवळच असलेल्या भातांगळी गावात एक तरुण कंबरेला गावठी कट्टा बांधून फिरत होता. गावात भर रस्त्यावर फिरत असल्यामुळे सगळीकडे दहशत माजली होती. हा प्रकार समजल्यावर पोलिसांनी तरुणाच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतलं असून त्याच्याजवळ असलेले गावठी पिस्तुल पोलिसांनी जप्त केलं आहे. या कारवाईत पोलिसांना त्याच्याजवळ एक गावठी कट्टा तसेच इतर संशयास्पद साहित्य सापडलं आहे. हे सर्व साहित्य पोलिसांनी जप्त केलंय.
पोलिसांनी ही कारवाई केल्यानंतर एकच चर्चा रंगली आहे. कंबरेला गावठी कट्टा बांधून हा तरुण नेमकं काय करु इच्छित होता ? हा प्रश्न विचारला जातोय. पोलीस त्या अनुषंगाने तपास करत आहेत.
दरम्यान, अशीच एक घटना पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये घडली. पिस्तुल बाळगल्याप्रकरणी पुण्यातील मावळ भागात एका तरुणाला 4 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती. पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने वडगाव मावळ येथे ही कारवाई केली होती. कुणाल बाबाजी हरपुडे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस वडगाव परिसरात पोलीस रेकॉर्डवरील आरोपींचा शोध घेत होते. त्यावेळी कुणालचे वर्तन संशयास्पद वाटल्यामुळे त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे पिस्तुल आढळून आले होते.
Video | Jan Ashirwad Yatra | सिंधुदुर्गात नारायण राणेंची जन आशीर्वाद यात्रा, कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत@MeNarayanRane #NarayanRane #JanAshirwadYatra #Sindhudurg #BJP #Konkan
अन्य बातम्या, व्हिडीओ पाहा – https://t.co/BV9be230nv pic.twitter.com/mwUG9lSo67
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 27, 2021
इतर बातम्या