मतदारसंघात फक्त नारळ फोडण्याचे काम; युवक काँग्रेसने अनोखे आंदोलन करून वेधले लक्ष

| Updated on: Jun 25, 2023 | 3:06 PM

महाविकासआघाडी सरकारच्या काळात मंजूर झालेली कामे मतदारसंघात सुरू आहेत. शिंदे सरकारच्या काळात कुठलेही काम प्रत्यक्षात सुरू नाही. फक्त नारळ फोडून कामे सुरू असल्याचा आव आणत आहेत.

मतदारसंघात फक्त नारळ फोडण्याचे काम; युवक काँग्रेसने अनोखे आंदोलन करून वेधले लक्ष
Follow us on

राजीव गिरी, प्रतिनिधी, नांदेड : गेल्या वर्षापासून नांदेड उत्तर मतदारसंघात विकासकामांचे नुसते नारळच फोडण्याचे काम सुरू आहे. पण, प्रत्यक्षात कामे होताना दिसत नाहीत. मागील एका वर्षापूर्वी मुख्यमंत्र्यांनी पासदगाव येथील आसना पुलाचे आणि छत्रपती चौक निळा-लिंबगाव रोडचे नारळ फोडले होते. परंतु प्रत्यक्षात ती कामे सुरूच झाली नाहीत. याच्या निषेधार्थ युवक काँग्रेसचे अध्यक्ष विठ्ठल पावडे यांच्या नेतृत्वाखाली आसना पुलावर नारळ फोडो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाने जिल्हा प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.

महाविकासआघाडी सरकारच्या काळात मंजूर झालेली कामे मतदारसंघात सुरू आहेत. शिंदे सरकारच्या काळात कुठलेही काम प्रत्यक्षात सुरू नाही. फक्त नारळ फोडून कामे सुरू असल्याचा आव आणत आहेत.

काम रद्द केल्याने अपघात वाढले

छत्रपती चौक ते निळा-आलेगावपर्यंतचा रस्ता अशोक चव्हाण यांनी बांधकाम मंत्री असताना अंदाजे १५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. प्रत्यक्षात कामही सुरू झाले होते. परंतु सत्तांतरानंतर मुख्यमंत्र्यांनी ते काम रद्द केले. नवीन काम मंजूर करण्यास एक वर्षाचा विलंब केला. त्यामुळे या रस्त्यावर वर्षभरात अनेक अपघात झाले.

विठ्ठल पावडे यांच्या नेतृत्वात आंदोलन

पासदगाव येथील आसना नदीवरील पुलाच्या कामाचेही वर्षभरापूर्वी नारळ फोडण्यात आले. अजूनही काम सुरू झाले नाही. त्याचेच कौतुक काय म्हणून आज ५६७ कोटींच्या कामाचे आज नारळ फोडणार असल्याची बातमी वाचण्यात आली. याचा निषेध म्हणून युवक काँग्रेसतर्फे अध्यक्ष विठ्ठल पावडे यांच्या नेतृत्वाखाली आसना पुलावर नारळ फोडो आंदोलन करण्यात आले.

यांचा आंदोलनात सहभाग

या आंदोलनात प्रदेश सचिव अतुल पेड्डेवाड, नगरसेवक श्याम कोकाटे, नगरसेवक दीपक पाटील, विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष शशिकांत क्षीरसागर, राहुल देशमुख, गजानन सावंत, सुरज शिंदे, सत्यवान अंभोरे, अक्षय आरसुळे, माणिक देशमुख, निखिल चौधरी, स्वप्नील नारहारे, अक्षय नलगे, अमोल जेठे, गंगाधर आडेराव, शुभम खोडके, अविनाश राजेगोरे, मुकेश पाटील, बारी पहेलवान, राहुल इंगोले, राजू धाडवे, ज्ञानेश्वर काकांडीकर, ऋषिकेश अमृतवाड, कैलास कल्याणकर यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांचा सहभाग होता.